सिंदखेड पोलीसांच्या वतिने बैठकीचे आयोजन,व पोलीसं मिञांना ओळख पञाचे वितरण
सारखनी प्रतिनीधी / रशीद फाजलाणी
नांदेड जिल्याच्या माहुर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या प्रमुख उपस्तिथीत व सारखनीच्या सरपंच सौ.वनमाला ताई तोडसाम यांच्या अध्यक्षते खाली सारखनी येथील ग्रामपंचायत मध्ये गणेश मंडळाचे प्रमुख व गणेश भक्तांन सोबत शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले, गणेशोंत्सव,पोळा व दुर्गाउस्तव हे सन अगदी जवळ येवुन ठेपली आहेत या सन उत्सवात कुठल्याही प्रकारचा अनुचीत प्रकार घडुनये या साठी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके हे प्रयत्नशील आहेत. कुठलयाही उत्सवात डि.जे.चा वापर व समाजात तेड निर्माण होईल असे गाने वाजवण्यावर बंदी घालत पारंपारीक नृत्य व लेझीम, लहान मुलांच्या सर्पधा, रांगोळी आदी वर जोर देवुन विर्सजन काळात रंग उधळण्या पेक्षा फुलांचा वापर करावा असे आव्हान करत कुठल्याही समाजाच्या व्यक्तीने अनुचीत प्रकार करत जातीय तेड निर्माण केल्यास त्याची गय केली जानार नसल्याचा ईशारा या वेळी देण्यात आला आहे.
![]() |
(पोळा,गनेशोत्सव,दुर्गाउस्त,व दसरा हे सन कोरोनाची नियम राखुन साजरी करा सहाय्यक पो.नि.भालचंद्र तिडके यांचे आव्हान)
कोरोना संसर्ग जरी आटोक्यात आला असला तरी अजुनही कोरोनाची तिसर्या लाटेची भीती बाळगुन येणारे पोळा, गनेशोत्सव, दुर्गाउत्सव, व दसरा आदी सनं साजरी करतांना आप आपल्या कुटुंबाची काळजी घेत कोरोना संसर्ग वाढु नये याची काळजी घेत सर्व सन उत्सव साद्या पद्धतीने साजरी करावीत असे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी केले आहे. या वेळी शांतीदुत व पोलीस मिञांना ओळखपञाचे वितरण करण्यात आले व या उत्सव काळात पोलीस मिञ व शांतीदुत यांची महत्वाची भुमीका असनार आहे, हि भुमीका पार पाळत असतांना पोलीस मिञ व शांतीदुत यांच्या कडुन सुद्धा अनुचीत प्रकार घडुनये अशी समज देखील स.पो.नी.भालचंद्र तिडके यांनी दीली.या वेळी पोलीस उप निरीक्षक जयसिंग राठोड,तंटामक्ती अध्यक्ष सोमसींग जाधव, व्यापारी लक्षमन मिसेवार,लक्ष्मण तोडसाम,भीमराव महाजन,नविन वाघमारे व ग्रामपंचायतच्या सदस्यां सह पोलीस मिञ, शांतीदुत, व्यापारी व पञकार उपस्तीथ होते.




कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें