ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 6 अगस्त 2021

माहुर ,पांडवलेणी परीसरातील अतिक्रमणावर हातोडा

प्रतिनिधी रशीद फाजलानी 

माहुर :- शहराच्या उत्तरेस लागुन असलेल्या शासकीय जमिनी वर अनाधिकृतरीत्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते ते अतिक्रमण जिल्हा अधिकारी विपिन इटनकर यांच्या आदेशाने साहाय्यक जिल्हा अधिकारी किर्ती किरण पुजार ,तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, मुख्याधिकारी विद्याताई कदम यांच्या उपस्थितीत हटविण्यात आले.

    शहराच्या उत्तरेस असलेल्या पांडवलेणी परीसरात जवळ पास २२ ते २५ नागरीकांनी टिन पत्रांची घरे उभारुन पुरातत्व विभागाच्या जागेवर अनाधिकृत अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्याने दि ६ आगस्ट रोजी जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार सकाळी १० वाजता पासुन अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरूवात करण्यापूर्वी तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी अतिक्रमीत नागरीकांना अवहान करण्यात आल्याने काही नागरीकांनी स्वता होवुन अतिक्रमण काठुन घेतले तर काहींचे नगरपंचायत प्रशासनाच्या कर्मचारी यांनी अतिक्रमण हटविले या वेळी पुरातत्व विभागाचे डॉ.किशोर सोलापूरकर, सुभाष पंडित,मनोज इटनकर,तर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवित काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक नामदेव रिठे,व्ही.एल.जाधव, साहेबराव संगरोळीकर व अन्य कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

 


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें