ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

मंगलवार, 23 फ़रवरी 2021

चिचखेड येथील शेतकऱ्याला खासदार हेमंत पाटील यांनी केली आर्थिक मदत

 

नांदेड/सारखनी प्रतिनिधि रशीद फाजलाणी 

किनवट : तालुक्यातील चिंचखेड येथील  अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराची  खासदार हेमंत पाटील यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना आर्थिक मदत केली.

 नांदेड  जिल्ह्यात मागील दोन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी वीज कोसळून शेतकरी आणि जनावरे दगावल्याची घटना घडल्या आहेत, यामध्ये किनवट तालुक्यातील चिंचखेड येथील रहिवासी आनंदराव शामराव चव्हाण हे शेतात गुरे चारण्यासाठी गेले असता दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोराच्या पावसामुळे त्यांच्या अंगावर वीज कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता,सदर घटनेची सिंदखेड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन. खासदार हेमंत पाटील यांना याबाबत वृत्त समजताच त्यांनी तात्काळ शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिल्यानंतर मदत मंजूर करण्यात आली.किनवट -माहूर  विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असताना खासदार हेमंत पाटील यांनी चव्हाण कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि आर्थिक मदतीची चार लाख रुपयाची रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केली

 यावेळी त्यांच्यासमवेत जोतीबा दादाखराटे तहसीलदार उत्‍तम कागने, पोलीस पाटील हनमंत नागोराव चव्‍हान, तलाठी एफ’बि’खैरे,सुनिल गरड पाटील , बालाजी मुरकुटे, सुनील पाटील,सुरज सातुरवार,बजरंग वाडगुरे, दिलीप भोसले,संतोष यलचलवार,कपिल रेड्डी,प्रमोद केंद्रे,मारेाती सुनकंलवार, आदी कार्यकर्ते उपस्‍तीथ होते.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें