ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

मंगलवार, 17 नवंबर 2020

शिवसेनेच्या महाआरतीने रेणुका मातेचे मंदिर भाक्ता साठी खुले.



प्रतिनीधी सारखनी /नांदेड रशीद फाजलानी



दि १७ मार्च पासून माहुर गडावरील सर्वच मंदीरे कोरोणा विषाणूच्या टाळेबंदी मुळे बंद करण्यात आली होती.त्या टाळे बंदीस थोड्या थोड्या प्रमाणात शिस्थिल करत बर्याच प्रमाणात छोटे मोठ्या व्यवसायास या पुर्वीच परवानगी देण्यात आली होती परंतु मंदीरे कुलुप बंद असल्याने दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडे करण्याच्या निर्णय घेतल्याने दि १६ नोव्हेंबर रोजी या धाडसी निर्णयाचे आनंद उत्सव साजरा करुन आई रेणुका मातेच्या दरबारी शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्योतीबा खराटे यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता महाआरती करुन भक्तासाठी रेणुका मातेचे मंदिर खुले करण्यात आले .
             माहुर गडावरील भगवान दत प्रभु, माता अनुसया व साडेतीन शक्ति पीठां पैकी एक मूळ शक्ति पीठ असलेल्या आई रेणुका मातेच्या मंदीरास कोरोणा महामारीच्या संकटामुळे शासनाने दि .१७ मार्च रोजी टाळेबंदीची घोषणा केली होती तेव्हा पासून मंदिरे बंद होती तब्बल ८ महीण्या नंतर कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने खबरदारी ची उपाययोजना म्हणून मंदिर प्रशासनास शासनाच्या नियमावलीच्या अधिन राहुन दि १६ नोव्हेंबर पासून मंदिरे उघडण्यास शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिल्याने शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्योतीबा खराटे यांच्या उपस्थितीत दि.१६ नोव्हेंबर रोजी आनंद उत्सव साजरा करुन आई रेणुका मातेस शारीरिक अंतराचे पालन करीत महाआरती करण्यात आली या वेळी  निरधारी जाधव, अनिल रूणवाल ,दिपक कांबळे,अँड यश खराटे, नितीन पाटील कन्नलवार, अशोक उप्पलवाड, विकास कपाटे,अभिषेक जयस्वाल,जितु चोले,अषिश चारभाई ,खुशाल तामखाने संदिप गोरडे हिरासिंग चव्हाण,यांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें