प्रतिनिधी : रशीद फाजलानी
74 स्वातंत्र्य दिनानिमित्त नांदेड जिल्हा तील नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता पडळकर साहेब यांनी कोरोना महामारी च्या काळात महावितरण कंपनीच्या कार्यात मोलाचा वाटा असलेला जनमित्र याचा गुणगौरव करण्यात आला त्याअनुषंगाने सारखणी शाखेतील उपविभाग किनवट येथील श्री राजू रामचंद्र पिंपळकर वरिष्ट तंत्रद यांनी ग्राहकांना दिलेल्या अखंडित विधुत पुरवठा, वसुली, उत्तम सेवा देऊन महावितरण कंपनीमध्ये केलेल्या कामगिरी बद्दल त्यांना कोरोना योद्धा सम्मान देऊन गुणगौरव केला हा सम्मानपत्र प्रमाणपत्र सारखणी शाखेचे कनिष्ट अभियंता तेलंग साहेब यांनी ध्वजवंदन झाल्यावर देण्यात आले तसेच सारखणी शाखेमध्ये इतर कर्मचारी व यंत्रचालक यांच्यासह सर्वांचा शब्द सुमानाने गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमास उमरी बाजार उपकेंद्र व सारखणी शाखेतील व गावातील मान्यवर उपस्थित होते.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें