ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 17 अगस्त 2020

कोरोना संकटात ही पोळा सण घरच्या घरी साजरा करण्याच्या तयारीत शेतकरी...

 

कोरोना संकटात ही पोळा सण घरच्या घरी साजरा करण्याच्या तयारीत शेतकरी... 

प्रतिनिधी : रशीद फाजलानी ,देवीदास ढगे 

श्रावण महिना शेवट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जा -राजा चा सण म्हणजे पोळा किंवा बैल पोळा होय.हा सण शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा असतो.

         नांदेड जिल्हाच्या अगदी टोकाला असलेल्या किनवट ,  माहूर संपूर्ण तालुक्यातील क्षेत्रात हा सण प्रत्यक गावा गावात साजरा केला जातो. या वर्षी भारतातील प्रत्यक सणावर कोरोना विषाणूंच संकट आल्याने जमेल त्या पद्धतीने सण साजरे करीत आहोत. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचा हा सण आहे.या दिवशी शेकरी राजा बैलाना सकाळी तेल लावतात स्वच्छ अंघोळ घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून सजवतात त्यांच्या अंगावर रंगानी नक्षी किंवा आकृती काढतात, अंगावर झूल घालतात, शिंगाना भासिंगे बांधतात गळ्यात आणि पायात घुंगरमाळ घालतात. त्यांची करतात त्यांची मिरवणूक काढतात. आणि इतर लोक म्हणजे ज्याच्याकडे बैल नाहीत असे लोक या दिवशी मातीची बैल तयार करून त्याची पूजा करतात. 

              पण आज या सणावर सुद्धा कोरोनाचे संकट आले आहे. लॉकडाऊन असल्या कारणाने घरच्या घरी बैला ना सजवून हा सण साजरा करणार आहेत. एरवी मागील प्रत्यक वर्षी सारखानी च्या मार्केट मध्ये या सणाच्या साहित्याने मार्केट गजबजून जात असे मात्र या वर्षी कोविड संकटामुळे मार्केट मध्ये थोडी मंदी जाणवली पण शेतकरी वर्ग हा सण आपल्या साठी नाहीतर आपल्या मेहनतीत अर्धा हिस्सा असणाऱ्या सर्जा -राजा साठी जमेल त्या पद्धतीने साजरा करण्याच्या तयारीत आहे.

म्हणूच जगाच्या पोशिंदा शेतकरी आणि त्यांचा सर्जा -राजा स मराठवाडा न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा........


मा. जिल्हाधिकारी,नांदेड  यांचे प्रतिबंधात्मक आदेशानुसार करोना महामारी संबधी सी.आर.पी.सी. चे 144 कलम लागू केले आहे. 

त्यानुसार पोळा सण सुद्धा एकत्रित येऊन सार्वजनिकरित्‍या साजरा करण्यावर बंदी आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस पाटील यांनी गावात सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रा.पंं. सदस्य व पोळ्याचे मानकरी यांची गावात छोटेखानी 5 लोकांचे उपस्थित मिटिंग घेऊन वरील आदेशानुसार सार्वजनिक कार्यक्रम घेण्यावर बंदी असल्याने तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध फौजदारी कारवाईची तरतूद असल्याने आपल्या गावात पोळा सण फक्त घरचे घरीच साजरा करण्याबाबत व बैलांना सार्वजनिक ठिकाणी किंवा मंदिरावर एकत्र नेता येत नाही, गावातील नागरिक एकत्र आले तर एकमेकांना संसर्ग होऊन कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याने गावकऱ्यांचे हिता करिता व गावकऱ्यांचे आरोग्याचे दृष्टीने सार्वजनिक पोळा भरविणे चांगले नाही म्हणून घरीच बैलाची पूजा करून घरीच सण साजरा करण्याबाबत त्यांना माहिती द्यावी. तसेच सगळ्या बाबी लक्षात आणून देऊन घरचे घरीच बैलाचे पूजन करण्याचे ठरवून तशी गावात दवंडीद्वारे प्रसिद्धी द्यावी, तसेच कोरोना रॅपिड टेस्ट करणे आरोग्याचे दृष्टीने आवश्यक असल्याचे महत्व सांगून गावातील 50 वर्षा वरील वयोगटातील नागरिक, मधुमेह , बीपी, हृदय विकार, दमा, ताप, सर्दी, खोकला ,तसेच गावातील गरोदर माता व ग्रामसमिती सर्व सदस्यांची तहसीलदार यांचे सूचनेनुसार रॅपिड चाचणी करिता यादी तयार करून तलाठी किंवा तहसीलदार यांचेकडे द्यावी, गावात सौजन्याचे वातावरण ठेवण्यासाठी सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रा प सदस्य यांची बैठक घेवून पोळा सना बाबत निर्णय घेऊन मिटिंग मधील सूचनांचे पालन करावे व कोणत्याही गावात पोळा भरणार नाही याची दक्षता घ्यावी ,याबाबत गावात काही मतमतांतरे किंवा अडचणी ,समस्या असतील तर  कळवाव्यात .सर्व  पोलीस पाटील मंडळींनी वरील सर्व बाबीबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें