ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शनिवार, 11 जनवरी 2020

शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत कृषी मालास योग्य व हमी भाव देण्यासाठी तत्परतेने पाऊले उचलण्याची गरज ! खा.हेमंत *भाऊ पाटील

शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत कृषी मालास योग्य व हमी भाव देण्यासाठी तत्परतेने पाऊले उचलण्याची गरज ! खा.हेमंत *भाऊ पाटील

रशीद फाजलानी नांदेड



देशातील शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादन केलेल्या मालास उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देऊनच सरकारने त्यांच्या मेहनतीचा सन्मान केला पाहिजे व हे सरकारच पाऊल शेतकऱयांच्या आत्महत्या नक्कीच रोखण्यासाठी मैलाचा दगड होईल अशी भावना मी विजयवाडा आंध्रप्रदेश  येथील संसदेच्या वाणिज्य समितीचा सदस्य म्हणून बैठकीत व्यक्त केली.सरकारने भक्कमपणे शेतकऱ्यांच्या या जीवन मरणाच्या प्रश्नावर ताबडतोब तोडगा काढणं गरजेचं आहे.एखादी कंपनी एखादे उत्पादन तयार करत असेल तर उत्पादन खर्च लावून नफा गृहीत धरूनच त्याचा भाव जाहीर करते व करोडोमध्ये नफा कमावते.त्याच धर्तीवर शेतात वर्ष वर्ष राबणाऱ्या शेतकरी,त्याचा परिवार,गुर ढोर,व त्यांच्या कष्टाच गणित आम्ही मांडणार का नाही त्यांच्या मेहनतीचा व घामाचा सन्मान करायचा असेल तर उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव व नफा हे सूत्र व त्याला कायद्याचं पाठबळ द्यावं ही मागणी संसदीय समितीच्या बैठकीत लावून धरली.आगामी काळातही संसदेत व जिथे जिथे संधी मिळेल तिथे याच माझ्या बळीराजाच्या सुखासाठी प्रयत्नात असेल.

वाणिज्य संसदीय समिती विजयवाडा आंध्रप्रदेश व नंतर बेंगलोर-कर्नाटक व कोची-केरळ राज्यात हळद प्रक्रिया उद्योग, सागरी उत्पादने, मिरची प्रक्रिया उद्योग यांसंबंधी शेतीमालाचे आयात निर्यात संदर्भी धोरण ठरविण्याचे काम ही समिती करत असते यावेळी मी अनेक संस्था,समूह व स्थळांना भेटी देऊन अभ्यास व परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें