ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

गुरुवार, 22 अगस्त 2019

काँग्रेस राष्ट्रवादी चे आघाडी सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार:- अजित पवार

काँग्रेस राष्ट्रवादी चे आघाडी सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार:- अजित पवार

सारखनी येथे जन स्वराज्य यात्रेला उसळला जनसागर!

 यात्रेचे अभूतपूर्व जंगी स्वागत !


माहूर :- नाकारत्या युती शासनाच्या काळात पाच वर्षात तब्बल १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.या सरकारला सामन्य नागरिक शेतकरी शी काही देणे घेणे नाही, केवळ पिक विमा कंपनी ला गब्बर करण्याचे काम हे शशन करीत आहे.शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री असताना व १५ वर्षे आघाडीचे शाशन असताना शेतकऱ्यांना आमच्या शासनाने कर्ज माफी दिली होती.हे राज्य सरकार ३ वर्षापासून केवळ कर्ज माफी ची घोषणा करीत आहे.एकही शेतकऱ्याला कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही.येत्या निवडणुकीत जनता जनर्धनाने आम्हाला सतेची संधी दिली तर शेतकऱ्यांचा कर्ज माफ करून सात बारा कोरा करू अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांनी सारखनी येथील सभेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून
किल्ले शिवनेरीवरील माती कलशात घेऊन निघालेली आहे.यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात आज दिनांक २१ रोजी सारखणी येथे दुपारी १२ वाजता पार पडली.या वेळी मंचावर खा.अमोल कोल्हे,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,अमोल मिटकरी,युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख,वसंत चव्हाण,आ. खाजा बेग,युवा नेते कपिल नाईक, बेबी ताई नाईक, जीप उपाध्यक्ष समाधान जाधव,माजी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी,जीप सदस्य मधुकर राठोड,दिनकर दहिफळे,विशाल जाधव,शिवराम जाधव,प्रवीण म्याकलवार,बंडु नाईक,प्रकाश गबा राठोड,अनिल कराळे, दत्तराव मोहिते,मेघराज जाधव,लक्ष्मण बेहेरे,मारोती रेकुलवार,शीतल जाधव,मेघराज जाधव, यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.


शिव स्वराज्य यात्रा सारखनी येथे पोहचताच बंजारा,आदिवासी व लभान समाजातील लोकनृत्यांनी मान्यवरांचे जंगी स्वागत करण्यात आले.या वेळी ३० हजारा पेक्षा जास्त जन समुदाय उपस्थिती होता.या वेळी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे,खा.अमोल कोल्हे,अमोल मिटकरी यांनी शषनाच्या धोरणाचा निषेध खरपूस समाचार घेतला. प्रास्ताविकातून आमदार प्रदीप नाईक यांनी आघाडी सरकार च्या काळात अजितदादा पवार जलसंपदा मंत्री असताना ६ बारेज मंजूर केले होते.त्यातील ४ बंधारे पूर्ण झाले असून त्याचे पाणी थांबविल्याने शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असून शेती वलीता खाली आली आहे.उर्वरित २ बंधारे  विरोधी सरकार आल्याने थांबल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.या शिवाय राज्यात सर्वत्र पक्षांतराचे वारे वाहत असून माझा राजकीय जन्म २० वर्षा पूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झाला व माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ही मी राष्ट्रवादीत राहणार असल्याचे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी अंदाजे ३० हजारापेक्षा जास्त जन समुदाय उपस्थित होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें