माहूर येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य अभिवादन !
· माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना समाजरत्न पुरस्कार
· महाराष्ट्राची राजगायिका कु. स्वराली जाधवचा सन्मान
· समाजातील जेष्ठ नागरिकांचाही केला विशेष सत्कार
शब्बीर दुंगे...माहूर...
माहूर( ता. प्र.) माहूर येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित दि. १४ एप्रिल रोजी बुद्धभूमी परिसरात पंचशील ध्वजारोहण करून तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न प्रज्ञासुर्य बोधीसत्व परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक व प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन सोहळ्याचे अध्यक्ष गोविंद मगरे पाटील तर प्रमुख पाहुणे योगी श्याम भारती महाराज, जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, जि.प. सदस्य संजय राठोड, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, विनोद राठोड, बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, भाजपनेते सुमित राठोड, शिवेसना ता.प्रमुख सुदर्शन नाईक, रेणुकादेवी संस्थानचे मुख्य सुरक्षा अधिकारी सुभेदार प्रकाश सरोदे प्राचार्य भगवानराव जोगदंड, बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष माहूर प.स.चे गटशिक्षणाधिकारी मसूद खान, प्रकाश गायकवाड,सरस्वतीराज राजु जाधव, सौ.वर्षा जाधव, मनोज कीर्तने, नगरसेविका सौ.ज्योती कदम, शीतल जाधव, सौ.नम्रता कीर्तने, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष एस.एस. पाटील, भाग्यवान भवरे, मनोज बारसागडे,संजय कांबळे, श्याम राठोड, लक्ष्मण बेहरे, मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कऱ्हाळे, दिगंबर जगताप, म.से.स.तालुका सचिव जयकुमार अडकीने, डी.डी.चव्हाण, श्रीरंग जगताप राहुल कायटे, विनोद कदम, प्रवीण वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक आचार संहितेच्या नियमांचे पालन करून राजकीय पक्षाशी संबधित नेते कार्यकर्ते अभिवादन करून गेल्यानंतर पुढील कार्यक्रम पार पाडत संयोजकांनी आचार संहितेचे पालन केले
प्रथम पंचशील ध्वजारोहण करून बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली श्रीमती कमलबाई पाटील यांनी बुद्ध वंदना घेतली त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमांचे व स्मारकाचे दीपप्रज्वलन करून पूजन करण्यात आले. त्या उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर सविस्तरपणे प्रकाश टाकणारी समयोचित भाषणे झाली.
याच सोहळ्यात माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना डॉ.बाबासाहेब आंबेडककर समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर महाराष्ट्राची राजगायिका ठरलेली कु.स्वराली जाधव हिचा विशेष सत्कार करण्यात आला आयोजन समितीच्या वतीने स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र, मानचिन्ह देऊन गौरव केला. तर जेष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान करून मान्यवरांचा पुष्पगुच्छ व निळ्या शाल देऊन सत्कार करण्यात आला. दुसऱ्या सत्रात सायंकाळी शहरातून क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे गटविकास अधिकारी विशालसिंह चौहान यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार टाकून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी, महात्मा फुले डॉ.बाबसाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश कांबळे व सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याचे प्रास्ताविक मनोज कीर्तने यांनी तर सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र कलाने यांनी केले या सोहळ्यास, शहरातील तमाम आंबेडकरी अनुयायी सर्वधर्मीय सर्वपक्षीय व संघटनाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहुसंख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें