ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

बुधवार, 10 अप्रैल 2019

एमआयडीसी वाळुज पोलिसांनी आवळल्या घरफोडीतील दोघा आरोपींच्या मुसक्या

एमआयडीसी वाळुज पोलिसांनी आवळल्या घरफोडीतील दोघा आरोपींच्या मुसक्या.........

नांदेड, रशीद फाजलानी

घरफोडी करणार्या दोन आरोपींना एमआयडीसी वाळुज पोलिसांनी सोमवारी जेरंबद केले असून, त्यांच्याकडुन मुद्देमाल जप्त करण्यता आला आहे.

वाळुज औद्योगिक क्षेत्रातील जोगेश्वरी येथील आंबेडकरनगर येथील रहिवासी ताराबाई सिताराम गणराज यांच्या घरी कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी ५ मार्च रोजी घराच्या दाराचा कडीकोेेंयडा तोडुन घरातील टी.व्ही, रोख दोन हजार, प्लास्टीक ड्रम, लोखंडी डम्बेल्स असा ऐवज पळविला होता.


 या चोरी प्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात ताराबाई गणराज यांनी तक्रार दिली होती. दरम्यान या चोरीचा तपास सुरू असताना एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्याचे डी.बी.पथक प्रमुख फौजदार राहुल रोडे यांना गुप्त बातमी दाराकडुन माहिती मिळाली. या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जोगेश्वरी झोपडपट्टीत भागात वास्तव्यास असल्याचे कळताच फौजदार राहूल रोडे आणि तपास अधिकारी पोहेकाँ वसंत शेळके यांनी सापळा रचून संशयित अमोल विलास भिवसने रा.जोगेश्वरी झोपडपट्टी, मुळगाव निधोना-बाबरा, ता फुलंब्री आणि गणेश रतन चाटसे रा.जोगेश्वरी झोपडपट्टी, मुळगाव आजेगाव जि. हिंगोली यांची चौकशी केली. यावेळी त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली.


यावेळी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडुन टी.व्ही, डम्बेल्स, ड्रम आणि रोख १००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें