ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

रविवार, 19 जुलाई 2026

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई चार लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त व एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सिंदखेड पोलिसांची मोठी कारवाई. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलिसांचे अवधंद्याविरुद्ध एल्गार.

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई चार लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त व एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सिंदखेड पोलिसांची मोठी कारवाई. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलिसांचे अवधंद्याविरुद्ध एल्गार. 


सारखणी प्रतिनिधी. रशीद फाजलानी 

नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात गौण खनिज व वाहतूकि विरुद्ध धडक कारवाई सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे, सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 18 जुलै 2026 रोजी प्रभावी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करत एकूण चार लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेण्यास सिंदखेड पोलिसांच्या पथकाला यश मिळाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 18 जुलै रोजी सपोनी संतोष जोंधळे व त्यांचे पथक अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना मौजे सिंदखेड कडून लवकरवाडी कडे जात असताना मनीरामथड धरणाच्या खालील बाजूने नाल्यातून एक ट्रॅक्टर वायफानी इकडे जाणाऱ्या रोडने संशयितरित्या येत असताना दिसून आला त्याला थांबवून ट्रॅक्टर क्रमांक MH 29 BC 6381 ची पाहणी केली असता त्याच्याकडे एक ब्रास अवैध गौन खनिज रेती मिळून आली चालकास कागदपत्र व परवाना बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र मिळुन आले नाही. त्या वेळी पोलिसांनी चालक नावे प्रमोद दत्ता मूरके वय 38 वर्ष व्यवसाय चालक राहणार सिंदखेड तालुका माहूर यास ताब्यात घेतले. सदरच्या कारवाईमध्ये सिंदखेड पोलिसांनी महिंद्रा 585 डी आय सरपंच कंपनीचा लाल रंगाचा हेड व लाल रंगाची ट्रॉली जिचा नंबर MH 29 BC 6381 याची किंमत अंदाजे चार लाख रुपये व एक ब्रास अवैध वाळू याची किंमत अंदाजे पाच हजार रुपये असा एकूण चार लाख पाच हजार रुपयाचा माल जप्त केला आहे. 

सदर प्रकरणात पोलीस स्टेशन सिंदखेड येथे गुरना 75 /2026 कलम 303 (2) BNS व सहकलम 4,21 खाण खनिज अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर प्रकरणात पुढील तपास पोलीस स्टेशन सिंदखेड चे पोलीस नाईक 2188 कोंडापलकुलवार हे करत आहे.

सदर कारवाई मा. श्री डॉक्टर नीलाभ रोहन पोलीस अधीक्षक नांदेड, अर्चनाताई पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विभाग भोकर, किरण कुमार भोंडवे उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संतोष जोंधळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंदखेड व पोलीस कॉन्स्टेबल 2208/रविकांत कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल/ 588 संजय शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल 1369/अंकुश इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल 1799 स्वप्निल नरवाडे व जिप चालक सर्व नेमणूक पोलीस स्टेशन सिंदखेड यांनी यशस्वीरित्या कार्यवाही पार पाडली. 

सपोनी संतोष जोंधळे यांनी आपला पदभार स्वीकारला तेव्हापासून अवैध गुटखा अवैध, मटका, गावठी दारू, अवैध देशी दारू सह अवैध रेती तस्करी जनावरांची वाहतूक करीत असलेल्या आरोपींवर कोणाचीही गै,न करता कार्यवाही केली आहे. त्यांच्या या यशस्वी कार्यवाहीसाठी माहूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांनी सपोनी संतोष जोंधळे व त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे. यापुढे अवैध धंद्याविरुद्ध अशीच धडक कारवाई चालत राहील असे सपोनी संतोष जोंधळे यांनी स्पष्ट केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें