ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

गुरुवार, 7 मई 2026

किनवट बाजार समिती सभापती, सचिवाच्या संगनमतातून दीड कोटीचा अपहार ? संचालकांची वरिष्ठांकडे तक्रार


किनवट बाजार समिती सभापती, सचिवाच्या संगनमतातून दीड कोटीचा अपहार ? संचालकांची वरिष्ठांकडे तक्रार

बाजार समिती गैरव्यवहाराची चौकशी करा - आ.केराम

किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी बाजार समितीच्या सभापती,सचिवाविरुद्ध दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून रितसर चौकशी व्हावी,खरोखरच बाजार समितीची एफडी तोडून रक्कम काढण्यात आली असेल,तर ती रक्कम परत बँकेत जमा व्हावी,अशी प्रतिक्रिया आ.भीमराव केराम यांनी दिली आहे.

किनवट - आधीच डबघाईला आलेल्या किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिवाच्या संगनमतातून बाजार समितीच्या जवळपास दीड कोटी रकमेचा बँकेतील 'एफ डी ' मोडून अपहार केल्याची तक्रार उपसभापतींसह १६ संचालकांनी सहायक निबंधकांकडे केली आहे.

किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यापूर्वीच्या संचालक मंडळाने बाजार समितीच्या मालकीची शेतजमीन विकली होती.या व्यवहारातून मिळालेली रक्कम ॲक्सिस बँकेच्या किनवट शाखेत मुदत ठेव ( फिक्स डिपॉझिट) करण्यात आली होती.त्यानंतर बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक होवून नवीन पदाधिकारी सत्तेत आले.बाजार समितीची उर्वरित जमीन विकण्याचा घाट काही संचालकांकडून सुरू होता. तथापि,याबाबीची सर्वत्र चर्चा झाल्याने संबंधितांचा तो ' डाव ' उधळला गेला.सद्यस्थितीत बाजार समितीत आर्थिक डबघाई आहे.कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा नियमित होत नाही.बाजार समितीमार्फत परिसरातील शेतकऱ्यांनी नाफेडला सोयाबीन विकले होते.'चतुर' सचिव व इतरांनी यातही संगनमत करून शेतकऱ्यांचा चांगला माल बाजारात विकून खासगी व्यापाऱ्यांचा खराब माल नाफेडच्या माथी मारला.जवळपास १२oo क्विंटल सोयाबीन विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना नाफेडमार्फतच मिळायला हवे होते.परंतु,बाजार समितीने शेतकऱ्यांचे पैसे समितीकडे वळविले.पैशासाठी तगादा,तक्रारी केल्यानंतर संबंधितांनी शेतकऱ्यांना पैसे अदा केले.ही बाब ताजी असतानाच विद्यमान सभापती गजानन मुंडे व सचिव रवी राठोड यांनी संगनमताने बाजार समितीचे ॲक्सिस बँकेतील एफडी मोडून कॅनरा बँकेमार्फत रक्कम उचल करून अपहार केल्याची तक्रार उपसभापती,संचालकांनी केली आहे. तक्रारीत किती रकमेचा अपहार केला,याचा उल्लेख नसला, तरी अंदाजे १ कोटी ६० लाखांची रक्कम हडपण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.पणन मंत्री जयकुमार रावल यांच्यासह सहायक निबंधक,नांदेड व किनवट तसेच आ.भीमराव केराम,पोलीस निरीक्षक,किनवट यांना दिलेल्या तक्रार अर्जावर उपसभापती राहूल नाईक यांच्यासह संचालक सोपानराव केंद्रे,श्रीराम कांदे,सुनील घुगे, बालाजी बामणे, प्रल्हाद सातव,प्रेमसिंग साबळे,कैलास बिज्जमवार,विद्या दासरवार, कुसूम मुंडे,अ.सत्तार,अनसूया पेंदोर,राजू सुरोशे,प्रेमसिंग जाधव,शेख हैदर शेख मुसा व नवीन राठोड यांच्या सह्या आहेत.यासंदर्भात सभापती गजानन मुंडे व सचिव रवी राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,दोघेही उपलब्ध होवू शकले नाहीत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें