ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 31 अक्टूबर 2025

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी संपन्न उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांचा सहभाग


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी संपन्न

उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांचा सहभाग

श्रीक्षेत्र माहूर

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त माहूर पोलीस ठाण्याच्या वतीने वसंतराव नाईक चौक ते बस स्थानक पर्यंत रन फॉर युनिटी चे आयोजन करण्यात आले होते या रन फॉर युनिटी कार्यक्रमात नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांचे सह अधिकारी कर्मचारी शहरातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला.

दिन 31/10/2025 रोजी 07.30 ते 08.00 वा. दरम्यान सह्याद्री टी पॉइंट माहूर येथून सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती निमित्त रन फॉर युनिटी चे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे सपोनी शरद घोडके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव यांचे सह कर्मचारी नागरिकांनी सहभाग नोंदवला. 

यावेळी पोलीस अंमलदार जाधव, राऊत, कोरडे, मुहूरले, कावडे, सोनसळे,खंदाडे, महिला अंमलदार, शिल्पा राठोड, शिवानंदा जाधव, भुरके,सारिका राठोड, मनीषा चव्हाण, नीलम राठोड यांचे सह पोलीस नागरिक व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें