ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 21 जुलाई 2025

जिल्हा परिषद गट क्रमांक 3 ला सारखणी ऐवजी दहेली करण्याची मागणी.

जिल्हा परिषद गट क्रमांक 3 ला सारखणी ऐवजी दहेली करण्याची मागणी.



सारखणी : जिल्हा परिषद प्रारुप रचना नमुना नांदेड जिल्हा परिषद 14 जुलै 2025 नुसार दहेली गावचे उपसरपंच राकेश तोटावार यांनी आज दिनांक 21 जुलै रोजी हरकत दाखल केले आहे. किनवट तालुक्यातील क्रमांक 03 हे जिल्हा परिषद गट सारखणी या नावाने आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या गट मध्ये ज्या ग्रामपंचायतीला मतदाराची संख्या जास्तीची आहे. त्या ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद गट म्हणून घोषीत करण्यात यावे असे असून जिल्हा परिषद गट क्रमांक 03 मध्ये दहेली ग्रामपंचातच्या मतदाराची संख्या 2152 आहे व सारखणीच्या मतदारांची संख्या ही 2055 आहे. त्यामुळे किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्रमांक 3 ला सारखणी ऐवजी दहेली असे नाव देण्यात यावे .असे दहेली ग्रामपंचातचे उपसरपंच राकेश तोटावार यांनी तहसीलदार किनवट यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें