प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत किनवट पंचायत समिती येथे कार्यशाळा संपन्न
या कार्यशाळेसाठी किनवट, माहुर, हिमायतनगर,भोकर, हदगाव, उमरी, धर्माबाद,मुखेड, मुदखेड, येथील तहसिलदार,गटविकास, ग्रामपंचायत अधिकारी, महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी या अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करताना सर्व जनजाती कुटुंबांचे आॕनलाईन सर्वेक्षण तात्काळ सुरू करुन विविध योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी यांना लाभ देण्यासाठी व विविध प्रकारचे दाखले/प्रमाणपत्रे देण्यासाठी आदेशीत केले. आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक भावनेतून काम करण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांना आव्हान केले.तर यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांनी या अभियानाबाबात मार्गदर्शन केले.कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी वसंत वाघमारे , कैलास गायकवाड, राजेश मॅकलवार यांनी परीश्रम घेतले.




कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें