ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

मंगलवार, 27 मई 2025

मान्सून स्थिर होईपर्यंत शेतकऱ्यांनी,पेरणीची घाई करु नये : जिल्हाधिकारी

मान्सून स्थिर होईपर्यंत शेतकऱ्यांनी,पेरणीची घाई करु नये : जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

रशीद फाजलानी 

नांदेड दि. 27 मे :- यावर्षी मराठवाड्यात आणि नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस खूप मोठया प्रमाणात आलेला आहे. हा पाऊस पुढच्या काही दिवसात स्थिर राहणार असला तरी हा अनियमित आणि अस्थिर स्वरुपाचा पाऊस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी शेतकरी बांधवांना केले आहे. 

शेतकऱ्यांनी मान्सून स्थिर झाल्यावरच कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणी करावी. पेरणीची घाई करु नये. आता पेरणी केल्यास पीकावर किड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच मान्सून स्थिर होण्यापूर्वी पेरणी केल्यास दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही. आताच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी मशागतीची कामे करावीत व मान्सून स्थिर होण्याची वाट पाहावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें