सारखणी येथिल पत्रकार रशिद फाजलाणी यांच्या विरुद्ध सिंदखेड पोलीसात सुरबुद्दीने केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी.
किनवटच्या पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांना निवेदन सादर केले.
किनवट/प्रतिनिधी- सारखणी येथिल पत्रकार रशिद फाजलाणी यांच्या विरुद्ध सिंदखेड पोलीसात गुन्हा दाखल झाला असून चौकशी करुन तो मागे घेण्यात यावा, यासाठी आज (३ मार्च) किनवटच्या पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांना निवेदन सादर केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे पत्रकारांना त्यांनी आश्वासन दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सारखनी येथील निर्भिड पत्रकार रशीद फाजलानी यांनी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी नांदेड चे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना सारखणी येथे अवैध वरली मटका चालत असल्याची माहिती दिली होती, सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीत कुठलेही अवैध धंदे चालू नसल्याचे वरिष्ठांना कळवणारे फौजदार रमेश जाधव यांनी वरिष्ठांच्या सूचनेवर वरली मटका चालत असलेल्या ठिकाणी जाऊन धाड टाकली त्यात संदेश उत्तम राठोड, निखिल संतराम पवार व मटका किंग शंकर विठ्ठल राऊत यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही माहिती वरिष्ठांना का दिली म्हणून सारखनी येतील मटका किंग शंकर विठ्ठल राऊत व त्याचा सहकारी किशोर राठोड यांनी संगणमत करून दूरध्वनीवरून पत्रकार रशीद फाजलानी यांना आमच्या अवैध धंद्याची माहिती वरिष्ठांना का दिली म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत सुद्धा सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकार रशीद फाजलानी यांनी आपल्या शोध पत्रकारितेच्या माध्यमातून सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील 54 गावाचा स्वतः जाऊन सर्वे केला व त्याबाबत आपल्या मराठवाडा न्यूज च्या माध्यमातून दिनांक 27 व 28 फेब्रुवारी रोजी सिंदखेड पोलिसांचा फलित उघड केला आपले सर्व अवैध धंदे उघड होत असल्याचे पाहून सिंदखेड पोलीस पोलिसांनी सारखणी येथील मटका किंग व धमकी प्रकरणातील आरोपी शंकर विठ्ठल राऊत याची खोटी तक्रार घेऊन पत्रकार रशीद फाजलानी यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला आहे, घटनेच्या तब्बल तीन दिवसानंतर मटका किंग ला खंडनिचा गुन्हा दाखल करण्याचे कसे सुचले असावे यामागे पत्रकार फाजलानी यांचे कुटुंबासह बाहेरील हितशत्रू व सिंदखेड पोलिसांची उघड होत असलेल्या अवैध धंद्याची यादी समोर येत असल्याने घाबरून संगणमत करून हा खोटा गुन्हा दाखल केला असल्याची चर्चा ऐकावयास येत आहे.
सिंदखेड पोलीस ठाण्यात सुडबुद्धीने खोटी तक्रार दाखल केल्यावरुन फाजलानी विरुद्ध गुरनं.३१/२०२५, कलम ३०८ (२), (३), ३५१ (२), बीएनएस २०२३ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. खातरजमा करण्यासाठी सदर प्रकरणी चौकशीवर ठेऊन तथ्यता समोर आल्यानंतर ही प्रक्रीया करायला पाहिजे होती ही पत्रकिरांची अपेक्षा आहे. मटका प्रकरणाचा घटनाक्रम पाहिला तर खंडणी प्रकरणातील तथ्यता लक्षात येईल. वार्तांकण करुन वृत्त प्रसिद्घ केल्यानंतर त्या मटकाचालकाने खोडसाळपणाची तक्रार देऊन पत्रकाराची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
उशिराने केलेली तक्रारच खुप कांही सांगून जाते. पत्रकार फाजलानी विरुद्धचे गुन्हे मागे घ्यावेत अशा आशयाचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी मळघणेंना दिले आहे. व्हाॅईस आँफ मीडिया शाखा किनवटचे अध्यक्ष जगदीश सामनपेल्लीवार आणि सचिव सुरेश कावळे यांच्या माध्यमातून पत्रकारांनी निवेदन दिले. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्तीला जात आहे तर अल्पसंख्याक समाजात मात्र सिंदखेड पोलिसांच्या प्रती रोष व्यक्त केला जात आहे...

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें