श्रीक्षेत्र माहूर
माहूर शहरातील आठवडी बाजारात शहरातील विश्रामगृहात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या महिलेची पैसे व सोने असलेली पर्स बाजार करत असताना खाली पडल्याने ती महिला पत्रकार सौ सुरेखा तळणकर यांना मिळाली त्यांनी बाजार करण्यासाठी आलेल्या महिला पोलिसांना ही बाब सांगून त्या महिलेचा बाजारातच शोध घेऊन पर्स तिला परत केल्याची घटना घडल्याने महिला पत्रकारासह महिला पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
माहूर दर सोमवारी मोठा आठवडी बाजार भरतो या बाजारात हजारोच्या संख्येने महिला पुरुष भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येत असतात यावेळी अनेकांचे पैसे पडणे पर्स हरवणे या सह इतर घटना घडत असतात गेल्या सोमवारी अशीच येथील विश्रामगृहावर स्वयंपाकी म्हणून काम करणारी महिला धनवंता ग्यानदास कुमरे ह्या बाजार करत असताना त्यांची पर्स एका दुकानाच्या बाहेर पडली ती पर्स महिला पत्रकार सौ सुरेखा तळणकर यांना दिसल्याने त्यांनी पर्स हातात घेऊन पर्स उघडून बघितली असता पर्स मध्ये महिलेचे आधार कार्ड होते त्यावरून बरीच शोधा शोध केली परंतु सदरील महिला मिळून आली नाही त्यामुळे बाजार करण्यासाठी आलेल्या महिला पोलीस शिपाई शिवनंदा जाधव आणि सपोऊपनी सुनील गायकवाड यांच्या पत्नी सौ कोमल गायकवाड यांना सदरील बाब सांगितल्याने त्यांनी पोउपनि शिवप्रकाश मुळे यांना सदरील घटनेची माहिती देऊन तिघींनी मिळून त्या महिलेचा बाजाराचा शोध घेतला त्या मिळून आल्याने त्यांना जागेवरच पर्स परत करून त्यांचे साहित्य व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करायला लावली महिला पत्रकार सुरेखा तळणकर तसेच महिला पोलिसांनी सदरील महिलेची पर्स खात्री करून परत केल्याने सपोनिं शिवप्रकाश मुळे यांचे सह मान्यवरांनी महिला पत्रकार सुरेखा तळनकर यांचे सह महिला पोलीसांचे अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें