ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 10 फ़रवरी 2025

वाई बाजार येथे रहदारीच्‍या ठिकानी धाडसी दरोडा. "देवदर्शनासाठी गेलेल्या उत्तरवार कुटुंबियांच्या घरावर चोरड्यांचा डल्ला"तर सिंदखेड पोलीस ठाण्‍याचे स.पो.नी. रमेश जाधवरला चोरट्यांचा सलाम,राञीची गश्‍त अवैद धंद्यावाल्‍याच्‍या पाठराखने साठीतर नाही ना ?

वाई बाजार येथे रहदारीच्‍या ठिकानी धाडसी दरोडा. "देवदर्शनासाठी गेलेल्या उत्तरवार कुटुंबियांच्या घरावर चोरड्यांचा डल्ला"तर सिंदखेड पोलीस ठाण्‍याचे स.पो.नी. रमेश जाधवरला चोरट्यांचा सलाम,राञीची गश्‍त अवैद धंद्यावाल्‍याच्‍या पाठराखने साठीतर नाही ना ?

 





माहूर, विषेश प्रतिनिधी

 

प्रयागराज येथे देवदर्शनासाठी गेल्याची संधी साधून येथील उत्तरवार कुटुंबाच्या बंद घरावर रहदारीच्‍या ठिकानी चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत लाखोंचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना आज (ता. 10) रोजी सकाळी उघडकीस आली असून याबाबत गुन्हा दाखल होवून तीन संशयितांना ताब्यात घेवून चौकशी सुरू असली तरी हाती काहीच लागले नसल्याचे विस्‍वस्‍नीय वृत्‍त आहे...

 

माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील नारायण श्रीधर उत्तरवार हे आपल्या कुटुंबियासमवेत दि. ५ रोजी प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी गेले होते.. दरम्यान मागील २ ते ३ दिवसापासून प्रयागराज येथील कुंभ मेळ्याहून आज दि.१० फेब्रवारी रोजी सकाळी ६ वाजता परत आल्यानंतर त्यांच्या घराचे मुख्य द्वार उघडे दिसून आले. तर घरातील सर्व सामानदेखील अस्त-व्यस्त पडलेले दिसले...त्यामुळे उत्तरवार यांनी सिंदखेड पोलीसात तक्रार दिली असून दिलेल्या तक्रारीत दोन तोळे सोन्याची गोप तसेच ३० हजार रूपयाची रोख रक्कम चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे... याप्रकरणी उत्तरवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५/२०२५ नुसार भारतीय न्याय संहितेचे कलम ३३१ (४) व ३०५ अन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर हे तपास करीत आहेत.. सदर घटनेबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून आज दुपारी श्वान पथकासह अंगुली मुद्रा पथकाला पाचारण करण्यात आले होते त्‍याचा सुद्धा फारसा विषेश फायदा झाला नाही. याप्रकरणी तीन संशयितांना सिंदखेड पोलीसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. सदर प्रतीनीधीने या बाबत अधीक माहीती घेण्‍याचा प्रर्यत्‍न केला असता सिंदखेड पोलीस ठाण्‍याचे स्‍वताहला सिंघम समजनारे स्वयघोषित दबंग पोलीस अधीकारी रमेश जाधवर, आणि वाई बाजार बिट चे अमलदार यांना दुरध्‍वनी केला असता ते नेहमी प्रमाणे व्‍यस्‍त होतेसिंदखेड पोलीस ठाण्‍याला जिल्‍हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दोन पोलीस जिप गाडया दिल्‍या असुन त्‍यात एक वातानाकुलीत वाहन आहेत्‍या वाहनातुन पोलीस अधीकारी राञीची गश्‍त करतात कि अवैध धंद्यावाल्‍यांची पाठ राखन करण्‍यासाठी गश्‍त केली जाते हा एक संशोधनाचा विषय आहे. माञ चोरट्यांनी सिंदखेड पोलीस ठाण्‍याच्‍या ढिसाळ कारबाराचा फायदा घेतला असुन दबंग पोलीस अधीकारी रमेश जाधवर चोरट्यांचा शोध घेतात कि हा ही प्रकरण लाल फितीत जमा होतो हे तर येणारा काळच ठरवणार आहे हे माञ तेवढेच खरे... 

दरम्यान वाई बाजार येथे आज उघडकीस आलेल्या घटनेची पुनरावृत्‍ती होवु नये यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांत कार्यन्वित असलेल्या ग्राम सुरक्षा दल तसेच नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांनी केले आहे....



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें