ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 31 जनवरी 2025

ॲड नैतिक नाईक यांचे व्यवसायिक मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न व्यापाऱ्यांनी करंट अकाउंट काढून त्यामध्ये व्यवहार करावे: SBI मॅनेजर ईशान शिंदे बँक जनतेची आहे आम्ही तर सेवक आहो:फिल्डऑफिसर महाले




ॲड नैतिक नाईक यांचे व्यवसायिक मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

व्यापाऱ्यांनी करंट अकाउंट काढून त्यामध्ये व्यवहार करावे: SBI मॅनेजर ईशान शिंदे

बँक जनतेची आहे आम्ही तर सेवक आहो:फिल्डऑफिसर महाले

सारखणी प्रतिनिधी /रशीद फाजलानी

किनवट तालुक्यातील सारखणी येथे दिनांक 29 जानेवारी रोजी आशा प्रतिष्ठान सारखणी या संस्थाच्या वतीने आयकर कर वस्तू सेवा कर आणि बँकिंग व्यवहार याविषयी मार्गदर्शन शिबिर आयोजन घेण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाकूर जाधव हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट नैतिक नाईक हे होते प्रमुख पाहुणे म्हणून सारखणी एसबीआय ब्रांच फिल्ड ऑफिसर महेश महाले मॅनेजर ईशान शेंडे प्रमुख पाहुणे म्हणून रामराव राठोड सुभाष राठोड लक्ष्मण मिसेवार व या कार्यक्रमाचे आयोजन संदीप पेन्शनवर संदेश राठोड वीरभद्र हारोळे करिष्मा भगत हे होते,या वेळी एडवोकेट नैतिक नाईक यांनी बोलताना म्हणाले की मी निराळा तांडा येथील रहिवासी असून मागील अनेक वर्षापासून नांदेड येथे व किनवट येथे त्यांची नैतिक नाईक अँड असोसिएट्स या फर्म च्या माध्यमातून त्यांचे इनकम टॅक्स, GST मधे कर सल्लागार म्हणून काम चालते आयकर जीएसटी व इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्याचे फायदे व जीएसटी ची कायप्रणाली कशी असते. लोन कसे मिळवावे आणि व्यवसायिक कागदपत्रांची जुळवा जुळव कशी ठेवावी व सिबिल बद्दल अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. तब्बल १ तास त्यांनी व्यापारी वर्गाला मार्गदर्शन केले. त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये समाधानकारक परतीक्रिया पाहावयास मिळाली,या वेळी सारखनी येथील व्यापारी. मंडळी डॉक्टर अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण सांगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन वीरभद्र हरवले यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें