ना.पंकजाताई मुंडे यांनी घेतले श्री रेणुकामातेसह दत्तप्रभूंचे दर्शन!
महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची शक्ती दे अशी श्रीचरणी केली प्रार्थना.
श्रीक्षेत्र माहूर /रशीद फाजलानी
भारतीय जनता पक्षाचे आधारवड स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची कन्या वातावरण बदल पर्यावरण मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी श्रीरेणुकामाते सह श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची शक्ती दे अशी मातेचरणी प्रार्थना केली.
दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी सोमवारी दुपारी तीन वाजता ना.पंकजाताई मुंडे यांचे शहरात प्रथमच आगमन झाले असता दत्तचौक टिपॉईंट येथे आमदार भीमराव केराम यांचे सह कार्यकर्त्याकडून जंगी स्वागत करण्यात आले तसेच भारतीय जनता पक्ष माहुरतर्फे फटाक्यांची आतिषबाजी व जे सी बी द्वारे पुष्पवृष्टी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांनंतर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर गडावर जाउन श्री रेणुकामातेस साडीचोळी खणा नारळाची ओटी विडा प्रसाद अर्पण करून महाआरती केली.संस्थानतर्फे विश्वस्त तथा पुजारी, संजय कान्नव, अरविंद देव, दुर्गादास भोपी, बालाजी जगत यांनी त्यांचा शाल श्रीफळ प्रसाद देउन सत्कार केला. श्री दत्त शिखर संस्थान येथे जाऊन त्यांनी श्री दत्तप्रभू चे दर्शन घेत प पु महंत मधुसूदन भारती यांचा आशीर्वाद घेतला.
यावेळी प्रशासनाच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तसेच तहसीलदार किशोर यादव यांनी श्री रेणुका माता मंदिरातील कार्यालयात नामदार पंकजाताई मुंडे यांचा सत्कार केला यावेळी देविदास राठोड तालुकाध्यक्ष श्रीकांत घोडेकर, प्राचार्य राजेंद्र केशवे सौ संध्याताई राठोड युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनायक मुसळे, नगरसेवक गोपु महामुने,प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे, किनवटचे संदीप केंद्रे महीला प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ.पदमाताई गिऱ्हे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे, शहराध्यक्षा सौ स्वाती आडे,सौ.निर्मला जोशी, सौ राधा उपलेंचवार् जेष्ठ कार्यकर्ते विजय आमले, नंदकुमार जोशी, पुरुषोत्तम लांडगे अपील बेलखोडे नंदु कोलपवार,अपिल बेलखोडे, शेख बाबू शेख हैदर राजु दराडे,सदबा मुंडे, सय्यद रहमत अली रामेश्वर मुसळे, निलेश तायडे,संजय शेडमाके यांचेसह भाजपा कीनवट माहुर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें