ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 4 नवंबर 2024

किनवट मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 6 नोव्हेंबरला प्रथम तपासणी

किनवट मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 6 नोव्हेंबरला प्रथम तपासणी - सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली.

रशीद फाजलानी

किनवट दि. 4 नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 83- किनवट विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी बुधवार 6 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत निवडणूक खर्च तपासणी कक्ष, आय. टी.आय. , किनवट येथे केली जाणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांच्यासमोर सादर करणे आवश्यक आहे. 

         अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमीत केलेल्या परिपत्रकांनुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल याची नोंद घ्यावी. 

       लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: ,ती स्वत: किंवा त्याच्या, तिच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तिला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे, असे  83- किनवट विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली (भाप्रसे) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें