ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शनिवार, 14 सितंबर 2024

कॉम्रेड सीताराम येचूरी यांची वाईबाजार येथे शोकसभा संपन्न



कॉम्रेड सीताराम येचूरी यांची वाईबाजार येथे शोकसभा संपन्न 

 वाई बाजार दिनांक 13 /9 /2024 

   मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव ज्येष्ठ नेते पॉलिट ब्युरो सदस्य तथा माजी खासदार काँग्रेस सिताराम यांचं दिल्ली येथे एम्स रुग्णालयामध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन 12/09/2024 रोजी तीन वाजून तीन मिनिटांनी निधन झालं ते बहात्तर वर्षाचे होते तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे त्यांचं दहावीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं शिक्षण घेत असताना ते तेलंगणा लढा मध्ये काम करत होते त्यांचे आई-वडील अधिकारी पदावर होते कॉम्रेड सीताराम मजुरी यांना शिक्षणासाठी दिल्ली येथे जे न्यू यूनिवर्सिटी मध्ये पाठवण्यात आलं तिथे त्यांनी एस एफ आय मध्ये काम करण्याची सुरुवात केली दोन वर्षानंतर 1974 ला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांमध्ये प्रवेश केला ते अतिशय हुशार होते आणि एम. ए. इकॉनॉमिक्स पर्यंत त्यांचं शिक्षण झालं होतं ते अतिशय हुशार व संसद पटू होते ते राजनीतीमध्ये एक चाणक्य होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची यांच्या निधनाने खूप मोठी हानी झाली आहे असे मत माकपा नांदेड जिल्हा सचिव कॉम्रेड शंकर सिडाम श्रद्धांजलीपर भाषणामध्ये व्यक्त केले या सभेला माहूर तालुक्यातून 200 कार्यकर्ते उपस्थित होते ही सभा माहूर्ति तालुक्यातील वाई बाजार नवीन बस स्टॅन्ड येथे घेण्यात आली

      यावेळी माहूर तालुक्यात तालुका माकपा कमिटीचे सचिव कॉम्रेड किशोर पवार यांनी सूत्रसंचालन केले यावेळी धरणग्रस्त समितीचे निमंत्रक कॉम्रेड डॉक्टर बाबा डाखोरे, कॉम्रेड अमोल आडे, कॉम्रेड डॉक्टर शुभलक्ष्मी डाखोरे, ग्रामपंचायत सदस्य बाबूखान पठाण, कॉम्रेड राजकुमार पडलवार यांनी श्रद्धांजली पर मत व्यक्त केले कॉम्रेड कादर खान, कॉम्रेड संजय मानकर, गांगंजी मेश्राम श्रीराम चव्हाण, तुलसी सेवा सोसायटीचे चेअरमन अनंतराव देशमुख हे उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें