शासनाचे आदेश डावलुन सूर्य आस्ता नंतर राञी उशीरा पर्यंत नियम बाह्य चालणार्या शिकवणी वर्गा वर केली जाणार कार्यवाही.......गट शिक्षणाधीकारी....
किनवट तालुका प्रतिनिधीः किनवटला लागूनच असलेल्या गोकुंदा शहरात शिकवणी वर्गाचा मोठा बाजार भरला असून शिकवणी वर्गाकडे विद्यार्थ्यांचा मोठा कल असला तरी या शिकवणी वर्गात येणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी मात्र कुठलीही उपाययोजना या शिकवणी वर्गाच्या संचालकाने केलीच नाही शिकवनी वर्गात येणाऱ्या मुलींच्या सुरक्षेसाठी सायंकाळी सहा वाजे नंतर शिकवणी वर्ग घेऊ नये असे शासनाचे आदेश असतानाही या आदेशाची पायमल्ली करीत रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत मुलींची शिकवणी वर्ग सुरूच असल्याने रात्री घरी परत जाताना विद्यार्थिनींची सुरक्षा ऐरणीवर आली असल्याने शीक्षण विभाग नियमबाह्य चालनार्या शीकवणी वर्गावर कार्यवाही करणार आहे. सायंकाळी सात नंतर मुलींची शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिकवणी वर्गाच्या संचालकावर कार्यवाही करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नाव न सांगण्याच्या अटीवर पालकांनी केली आहे याबाबत गटशिक्षणाधिकारी ही संबंधित शिकवणी वर्गाच्या संचालकाला लेखी स्वरूपात तंबी देणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले. किनवट व गोकुंदा येथे मोठ्या संखेनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय असून येथील विद्यार्थी चांगली टक्केवारी घेऊन उत्तीर्ण व्हावे यासाठी शिकवणी वर्गाकडे वळला आहे नांदेड पाठोपाठ किनवट व गोकुंदा शहरात मोठ्या प्रमाणात शिकवणी वर्ग कोचिंग क्लासेस सुरू आहेत या कोचिंग क्लासेस ला कुणाचाही विरोध असण्याचे कारणच नाही या ठिकाणी विद्यार्थी घडविले जात असले तरी मुलींच्या दृष्टीने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्य शासनाने या शिकवणी वर्गाला सायंकाळी सहा नंतर सूर्योदयापर्यंत बंदी घातली आहे पण या शिकवणी वर्गावर शिक्षण विभागाचे नियंत्रण राहिले नाही मुलींच्या छेडछाडीच्या काही घटनाही यापूर्वी घडल्या होत्या पोलिसांनी चिडीमार पथकही नेमले आहे पण सध्या पोलीस दलाकडे अपुरी पोलिस यंत्रणा असून गजबजलेल्या गोकुंदा परिसरात रात्री दहा वाजेपर्यंत मुलींची शिकवणी वर्ग मोठ्या प्रमाणात चालत असून हे शिकवणी वर्ग संपल्यानंतर किनवट शहराच्या विविध भागात व गोकुंदा शहरातही मुली घरी परत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली जात नाही एखादी मोठी घटना घडल्यानंतर जागे होण्याआधीच या शिकवणी वर्गाच्या संचालकांना आदेश देऊन सायंकाळी मुलींचे शिकवणी वर्ग व सुरू राहणार नाही याची दक्षता घ्यावी आपल्या मुली शिकून मोठ्या झाला पाहिजे शिकवणी वर्गातून त्यांना चांगले ज्ञान मिळावे ही रास्ता अपेक्षा पालकांची असली तरीही सर्वच पालक आपल्या मुलींना रात्री घरी घेऊन जाण्यासाठी वर्गापर्यंत येऊच शकत नाही सायकल व लहान मोठ्या दुचाकी वाहनावर मुली परत जाताना काही टार्गट मुले ही मुलींना भीती दाखवण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून रात्री चालणारे मुलींचे शिकवणी वर्ग कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी ही खुद्द पालकांनीच केली आहे पण शिकवणी वर्गातून आपल्या मुलींना संचालकाने काढू नये म्हणून याबाबत ते शब्दही काढत नाहीत व नाव न छापण्याच्या आटी वर काही पालकांनी आपली व्यथा ही माध्यमांना बोलून दाखवली आहे याबाबत गटशिक्षण अधिकाऱ्यांनीही सायंकाळच्या वेळी नियमबाह्य पद्धतीने मुलींची शिकवणी वर्ग सुरू राहत असतील तर त्यांचे विरुद्ध दंडात्मक कारवाई करणार असल्याचेही गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले आहे याबाबत पोलिसही ॲक्शन मोडवर आले असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सायंकाळी राञी चालनारे शिकवणी वर्ग बंद झालेच पाहिजे ही पालकांची मागणी रास्त नाही काय?

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें