ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 26 अप्रैल 2024

लोकसभेसाठी किनवट विधानसभेत शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली

 लोकसभेसाठी किनवट विधानसभेत शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली




किनवट : हिंगोली लोकसभा मतदार संघातर्गत येणाऱ्या किनवट विधानसभा मतदार संघात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली.

          विधानसभा मतदार संघात 330 मतदान केंद्रावर शुकृवारी (ता.26) निर्भय, मुक्त वातावरणात , शांततेत सुरळीत पार पडले. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 लाख 38 हजार 536 पैकी 75 हजार 968 पुरुष, 1 लाख 30 हजार 578 पैकी 70 हजार 358 महिला, 12   पैकी 02 इतर (तृतीय पंथी) मतदारांनी अशा एकूण 2 लाख 69 हजार 126 मतदारांपैकी 1 लाख 46 हजार 328 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. 

पाच वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे : पुरुष 54.84 %, महिला 53.88 % व इतर 16.67% , एकूण 54.37 % 

          येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात असलेल्या चार मतदान केंद्रापैकी एक दिव्यांग मतदान केंद्र व सर्व महिला मतदान अधिकारी असलेलं एक सखी मतदान केंद्र होतं. हे मतदान केंद्र संपूर्ण गुलाबी रंगात रंगविलेलं होतं. येथे गुलाबी फुग्यांची भव्य कमान, मतदार जागृती रांगोळी, भिंती गुलाबी, टेबल क्लॉथ गुलाबी, महिला मतदान अधिकारी यांनी गुलाबी फेटे बांधून रंगाचे वस्त्र परिधान केले होते. येथे मतदारांना येणाऱ्यासाठी गालिछे अंथरले होते. येथे शुद्ध थंड पिण्याचे पाणी, रॅम्प व व्हील चेअरने परिपूर्ण होते. येथे बिस्किट देऊन मतदाराचे स्वागत करण्यात आले. हे केंद्र सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं.

      काही मतदान केंद्रावर मतदानापूर्वी व प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदान यंत्र संच, तर कुठे एकल मतदान युनिट , व्हीव्हीपॅट , बॅटऱ्या बदलण्यात आल्या. ह्या किरकोळ तांत्रिक बाबी वगळता सर्वत्र सुरळीपणे मतदान पार पडले.

          शुक्रवारी (ता.26) पहाटे 2.30 वाजता झोन निहाय नियुक्त सर्व क्षेत्रिय अधिकारी , मास्टर ट्रेनर व इतर अधिकारी मतदान यंत्रे व बॅटरी संच घेऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोकुंदा येथील स्ट्राँग रूम येथून आपापल्या क्षेत्रात रवाना झाली. 

          सहायक निवडणूक अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शना खाली किनवटच्या तहसिलदार डॉ. शारदा चौंडेकर, माहूरचे तहसिलदार किशोर यादव, मुख्याधिकारी तथा नायब तहसिलदार (निवडणूक)  मुगाजी काकडे, नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, व्ही.पी. राठोड, अनिता कोलगणे, राजकुमार राठोड, कैलास जेठे, आदिंसह मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे, मल्लिकार्जून स्वामी, रुपेश मुनेश्वर, रमेश मुनेश्वर, प्रकाश टारपे, के.डी. कांबळे, डी.सी. भुरे , नितीन शिंदे, व्ही.टी. सूर्यवंशी, एस.पी. जुंकटवार, गोविंद पांपटवार, संदीप पाटील , प्रभू पानोडे , संतोष मुपडे , भेलचे इंजिनियर आदिंसह विविध कार्यालयाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, शिपाई व कोतवाल निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें