ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

गुरुवार, 18 जनवरी 2024

मौजे पाटोदा ता. किनवट येथे अवैध रेती वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर पकडून केली कार्यवाई.

मौजे पाटोदा  ता. किनवट येथे अवैध रेती वाहतूक करताना रात्री 1 वाजताच्या दरम्यान दोन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय किनवट येथे लावण्यात आले.

किनवट प्रतिनिधी रशीद फाजलानी

किनवट तालुक्याच्या मौजे पाटोदा येथे अवैध रेती तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून मा.सहायक जिल्हाधिकारी साहेब, मा.तहसीलदार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नियुक्त करण्यात आले या पथकामध्ये मंडळ अधिकारी कांबळे, तलाठी मेंडके मॅडम, गौतम पांढरे, विश्वास फड, आदिनाथ डुकरे, मेघशाम सांगवीकर, सुशील जाधव हे होते. यांनी रात्री बारा ते एक च्या दरम्यान सापळा रचून मौजे पाटोदा  ता. किनवट येथे अवैध रेती वाहतूक करताना रात्री 1 वाजताच्या दरम्यान दोन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय किनवट येथे लावण्यात आले.विशेष म्हणजे या कारवाईत महिला तलाठ्याने सुद्धा सहभाग घेतला हे मात्र विशेष, कुठलेही शस्त्र नसताना महसूल विभागाचे अधिकारी रात्री बे रात्री कारवाई करतात यामध्ये पोलीस विभागाने सुद्धा पथकाला संरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. किनवट तालुक्यात ज्याप्रकारे रेती तस्करावर कारवाई केली जात आहे यामुळे आता रेती तस्करात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.....


 


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें