ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

मंगलवार, 27 जून 2023

आगामी सन उत्सव बकरी ईद व आषाढी एकादशी सणोत्सव शांततेने साजरे करा.. स.पो.नी.सुशांत किंनगे यांचे आवाहन.

आगामी सन उत्सव बकरी ईद व  आषाढी एकादशी सणोत्सव शांततेने साजरे करा.. स.पो.नी.सुशांत किंनगे यांचे आवाहन.

सारखनी प्रतिनिधी/ रशीद फाजलानी

           आगामी काळात बकरी ईद (ईदुल आदाह) व आषाढी एकादशी हे महत्‍वाचे सन एकाच दिवशी म्‍हन्‍जे दि.२९ जुन रोजी साजरे होनार आहेत, या सर्व बाबींना लक्षात घेता दि.२६ जुन रोज सोमवार या दिवशी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किंनगे यांच्या नेतृत्वात सारखनी येथील पोलीस चौकीत शांतता कमिटीच्‍या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सारखनी, व वाई बाजार व परिसरात कोणत्याही प्रकारचे जातिवाद ताण तणाव नसुन असीच शांतता रहावी व कुठलाही अनुचीत प्रकार निर्माण होवु नये तसेच शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटे कोरपणे पालन करुन सर्व सण उत्सव  आनंदाने साजरी करावी असे आवाहन  सुशांत किंनगे यांनी केले. सर्व मुस्लिम बांधवांना ईद च्या तर हिंदू बांधवांना आषाडी एकादशी च्या सना पुर्वीच शुभेच्छा दिल्या. या वेळी स.पो.नी.सुशांत किंनगे यांनी नवतरुण मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले व्‍हाटस्‍अप व फेसबुक च्या  माध्यमातून जातीय तेड निर्माण होईल असे  कोणतेही मेसेज व्हायरल करू नये तसे करुन जातीय तेड निर्माण केल्‍यास पोलीस त्‍याला त्‍याची जागा दाखवेल असा सज्‍जड ईशारा त्‍यांनी बोलतांना दिला. काही अडचण किंवा  समस्या असल्यास मला संपर्क करावे  तुमच्या समस्या दूर करण्यासाठी लगेच तुमच्या मदतीला पोलीसतत्‍पर आहेत कुनीही कायदा हातात घेवु नयेत अश्‍या सुचना दिल्‍या. सनासुदीच्‍या काळात कुठलाही अनुचीत प्रकार घडल्‍यास पोलीस कुणाची ही गय करणार नाहीत असेही त्यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत सांगितले. या वेळी सारखनी येथील प्रतीष्‍ठीत व्‍यापारी,सर्व पक्षाचे नेते व कार्यकर्ते जामा मस्जिद चे हाफिज   साहब, मौलाना,पत्रकार,पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ  आदींची उपस्थिती होती.
















कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें