सिंदगी मोहपुरचे मंडळ अधीकारी एल.जी कानगुले यांनी अवैधरेती तस्करी करनारे टिप्पर केले जप्त.
सारखनी प्रतीनीधी (रशीद फाजलानी)
दि.१०/ जुन २०२२ रोजी सकाळी माहुर तालुक्यातुन किनवट तालुक्यात अवैध रेती तस्करी करणारे MH 29 BE 5010 क्रमांकाचे टिप्पर, किनवट कडे जात असतांना सिंदगी मोहपुरचे मंडळ अधीकारी एल.जी.कानगुले व तलाठी एन.एस.माळोदे यांनी मोठ्या शिताफीने तिन ब्रासचे टिप्पर जप्त केले असुन संबधीत वाहनाचे अहवाल वरिष्ठांना देण्यात आले असुन वरिष्ठ काय आदेश देतात या कडे लक्ष लागुन आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि माहुर तालुक्यातील पडसा येथील खुख्यात रेती तस्कर ईम्रान शेख नवाब याच्या भावाच्या नावावर असलेल्या वरिल वाहनात दर रोज दिवस राञ महसुल व पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करुण एकाच रायल्टीवर अनेक वेळा रेती तस्करी करत असतो तर मॅजीक पेनचा सर्रास वापर करत असतो,माञ चोर कितीही हुशार असला तरी एक न एक दिवस पकडला जातो या म्हनी प्रमाने ईम्रान शेख नवाब याच्या भावाच्या नावावर असलेल्या MH 29 BE 5010 क्रमांकाचे टिप्पर दि.१० जुन २०२२ रोजी सकाळी सारखनी मार्गे किनवट कडे जात असतांना राजगड वरुन या वाहनाचा सिंदगी मोहपुरचे मंडळ अधीकारी एल.जी.कानगुले व तलाठी एन.एस.माळोदे यांनी पाठलाग करत थेट किनवट जवळ या वाहनाची रायल्टीची तपासनी केली असता या वाहनाची रायल्टी दि.०९ जुन २०२२ रोजी मध्य राञी समाप्त झाल्याचे निर्दशनास आले,वाहन चालकाला अधीक विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने सदर वाहनास किनवट येथील सहाय्यक जिल्हाधीकारी यांच्या कार्यालयात जप्त करुन ठेवण्यात आले आहे. मंडळ अधीकारी एल.जी.कानगुले व तलाठी एन.एस.माळोदे यांनी सदर वाहनाचा पंचनामा करुन वरिष्ठ अधीकार्या कडे दाखल केला आहे. वरिष्ठ अधीकारी पुढील दंडात्मक कार्यवाही व चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देतात कि काय या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खुख्यात रेती तस्कर ईम्रान शेख नवाब याच्या गुन्हेगारीवर एक नजर
खुख्यात रेती तस्कर ईम्रान शेख नवाब याच्या वर माहुर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्यात बलत्कार, व अवैधरेती तस्करी करित असतांना चौकशी करीत असलेल्या अधीकार्याच्या शासकिय कामात आर्थळा निर्माण करणे, हानामारी करुन जिवे मारण्याची धमकी देण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असुन तो गुन्हेगार प्रवृतीचा असल्याचे चिञ एकाच पोलीस ठाण्यात असलेल्या अनेक गंभीर गुन्ह्या वरुन दिसुन येत आहे....
रेती तस्कर ईम्रान शेख चा मोठा रेती साठा माहुर ताल्रक्यातील पडसा येथे....
माहुर तालुक्यातील पडसा या पैनगंगा नदी मधुन दिवस राञ एक करुन जेसीबीच्या सहाय्याने शेकडो ब्रास अवैध रेतीसाठा पडसा या गावात करुन ठेवण्यात आला असुन त्या रेती साठ्याचे बोलके चिञ मराठवाडा न्युजच्या हाती लागले आहेत. या अवैध रेती साठ्याची सखोल चौकशी माहुरचे तहसीलदार किशोर यादव हे स्वताह करतील असा विस्वास व्यक्त केला जात आहे. या प्रकणात लवकरच एक शिष्टमंडळ नांदेडचे जिल्हाधीकारी डॉ.विपीन ईटनकर यांची भेट घेनार असल्याचे विस्वसनीय वृत्त आहे. तर मंडळ अधीकारी एल.जी.कानगुले व तलाठी एन.एस.माळोदे यांच्या धडक कार्यवाही ची प्रशंशा केली जात आहे हे माञ विषेश.....


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें