हादगाव प्रतिनिधी. दिनांक25 जानेवारी2022. हदगाव येथील दैनिक सायरन या वृत्तपत्रा ने शहर व तालुक्यातील अवैध धंदे महिला मुलींची छेडछाड व इतर सत्यघटना घडामोडीवर आधारित दिनांक 5 जानेवारी 2022. रोजी येथील प्रतिनिधी विजय कोल्हे यांनी वृत्त प्रकाशित केले होते. ते वृत्त पोलिस जमादार अधिकारी यांच्या कुटुंबात वाचण्यात गेल्याकारणामुळे हदगाव पोलिस आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने कटकारस्थान करून संगनमताने माननीय, जिल्हाधिकारी. माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड.यांना निवेदन देऊन पत्रकार क्षेत्रावर दबाव टाकण्याचे कटकारस्थान रचून वृत्तपत्र चालक आणि पत्रकार यांचेवर कारवाई करण्याची मागणी करून कायद्याच्या चौथ्या स्तंभाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ माय माऊली न्यूज चैनल चे नांदेड जिल्हा( उत्तर) प्रतिनिधी प्रकाश जाधव. दैनिक युगांतर. चे हादगाव तालुका प्रतिनिधी वैजनाथ गुडूप. यांनी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी दिनांक 25/ 1/ 2022.रोजी सकाळी 11 वाजता आमरण उपोषणास प्रारंभ केला असून हदगाव पोलिस बीट जमादार यांच्या सेवा कार्यकाळाची चौकशी करा. पोलीस बॉईज संघटना हदगाव पोलिस यांच्या संबंधाची आणि मोबाईल सि डी आर ची. सायबर सेल विभागा मार्फत चौकशी करा. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन संघटनेचे कायदेशीर रजिस्ट्रेशन ची चौकशी करा. पोलीस ठाण्यातील गोपनीय माहिती इतरांना देऊन पोलिस अधिकाऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या येथील पोलिस जमादार यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. ह्या मागण्या निवेदनातनमूद करून आज दिनांक 25 जानेवारी 2022. रोजी पत्रकार. वैजनाथ गुडूप. आणि पत्रकार.प्रकाश जाधव ह्या दोघांनी हदगाव तहसील कार्यालयापुढे "आमरण" उपोषणास प्रारंभ केला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें