ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 6 सितंबर 2021

पोळा हा सन साजरा करण्याच्या तयारीत शेतकरी...

 

प्रतिनिधी : रशीद फाजलानी 

श्रावण महिना शेवट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जा -राजा चा सण म्हणजे पोळा किंवा बैल पोळा होय.हा सण शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा असतो.
         नांदेड जिल्हाच्या अगदी टोकाला असलेल्या किनवट ,  माहूर संपूर्ण तालुक्यातील क्षेत्रात हा सण प्रत्येक गावा गावात साजरा केला जातो. या वर्षी भारतातील प्रत्यक सणावर कोरोना विषाणूंच संकट आल्याने जमेल त्या पद्धतीने सण साजरे करीत आहेत.पोळा हा सण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचा हा सण आहे. या दिवशी शेकरी राजा बैलाना सकाळी तेल लावतात स्वच्छ अंघोळ घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून सजवतात त्यांच्या अंगावर रंगानी नक्षी किंवा आकृती काढतात, अंगावर झूल घालतात, शिंगाना भासिंगे बांधतात गळ्यात आणि पायात घुंगरमाळ घालतात. त्यांची मिरवणूक काढतात. आणि इतर लोक म्हणजे ज्याच्याकडे बैल नाहीत असे लोक या दिवशी मातीची बैल तयार करून त्याची पूजा करतात. 
               प्रत्येक वर्षी सारखानी च्या मार्केट मध्ये या सणाच्या साहित्याने मार्केट गजबजून जात असे मात्र या वर्षी कोविड संकटामुळे मार्केट मध्ये थोडी मंदी जाणवली पण शेतकरी वर्ग हा सण आपल्या साठी नाहीतर आपल्या मेहनतीत अर्धा हिस्सा असणाऱ्या सर्जा -राजा साठी जमेल त्या पद्धतीने साजरा करण्याच्या तयारीत आहे.

कविता 

वाडा शिवार सारं । 

वडिलांची पुण्याई।। 

किती वर्णू तुझे गुण | 

मन मोहरून जाई ।। 

तुझ्या अपार कष्टानं । 

बहरते सारी भुई ।। 

एका दिवसाच्या पूजेनं! 

होऊ कसा उतराई!!

कृषीप्रधान संस्कृतीमधला 

महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या, 

🌿सर्व बांधवांना हार्दिक 

शुभेच्छा.!!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें