ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

गुरुवार, 23 सितंबर 2021

उमरखेड पोलीसांनी अवैध गुटख्‍यासह दुचाकी केली जप्‍त,तिन आरोपी विरुद्ध गुन्‍हा दाखल दोन आरोपी फरार.

उमरखेड पोलीसांनी अवैध गुटख्‍यासह दुचाकी केली जप्‍त,तिन आरोपी विरुद्ध गुन्‍हा दाखल दोन आरोपी फरार.
आरोपी सैय्यद आमेर

 उमरखेड प्रतिनीधी / रशीद फाजलाणी

यवतमाळ जिल्‍याच्‍या उमरखेड पोलीस ठाने हद्दी मधुन ढाणकी कडे दुचाकी वरुन अवैध गुटखा जात असल्‍याच्‍या गोपनीय माहीती वरुन उमरखेड पोलीस ठाण्‍याचे फौजदार अमोल माळवे यांच्‍या पथकाने दुचाकी सह ५० हजाराचा मुद्देमाल जप्‍त केला असुन तिन आरोपी विरुद्ध गुन्‍हे दाखल केले आहेत, त्‍यात नांदेड जिल्‍याच्‍या हिमायतनगर येथील एका आरोपीचा समावेश आहे. 

    या बाबत सविस्‍तर वृत्‍त असे कि गुन्‍हेगारांचे गर्दनकाळ म्‍हणुन परिचीत असलेले यवतमाळ जिल्‍याचे जिल्‍हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ व अप्‍पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरने यांनी जिल्‍यातील सर्वच पोलीस ठाण्‍याच्‍या अधीकार्यांना अवैध धंदे बंद करण्‍या बाबत कडक सुचना दिल्‍या होत्‍या व आपल्‍या पोलीसठाने हद्दीत अवैध धंदे दिसुन आल्‍यास संबधीत ठाने प्रमुखाला मुख्‍यालई हजर केले जाईल असे कडक आदेश दिले होते. त्‍या अनुशंघाने यवतमाळ जिल्‍यात अनेक ठिकानी अवैध धंदे चालका विरुद्ध कार्यवाही करण्‍यात आल्‍या असुन यवतमाळ जिल्‍यात लाखो रुपयाचा महाराष्‍ट्र शासनाने बंदी घातलेला अवैध गुटखा  जप्‍त करुन गुटखा तस्‍करांना सळो कि पळो करुन सोडले आहे.

    याचाच एक भाग म्‍हणुन अली कडेच यवतमाळ जिल्‍यातील उमरखेड येथील फौजदार अमोल मालवे यांना मिळालेल्‍या गोपनीय माहीती वरुन उमरखेड शहरातील युपी कॉलनी समोरील नगर पालीकेच्‍या बगीच्‍या समोर सापळा रचुन नांदेड जिल्‍याच्‍या हिमायतनगर कडुन दुचाकी वरुन जात असलेला अवैध गुठखा सह दुचाकी जप्‍त केली असुन एका आरोपीला जेरबंद केले आहे.  या प्रकरणात उमरखेड पोलीसांनी कुठचाच विलंब न करता मुख्‍य आरोपी अरबाज पठान वय २१ वर्षे रा.ढाणकी ता.उमरखेड, याचे सह सैय्यद अर्शद सैय्यद अजगर व नांदेड जिल्‍याच्‍या हिमायतनगर येथील खुख्‍यात गुटखा तस्‍कर सय्यद आमेर सय्यद खमर यांच्‍या विरोधात कलम भादवी ३२८,२६९,२७०,२७२,२७३,१०९ अन्‍वये उमरखेड पोलीसांनी गुन्‍हा दाखल केला असुन आरोपी अरबाज पठान यांला अटक केली असुन दोन आरोपी माञ फरार आहेत त्‍यांचा शोध उमरखेड पोलीस घेत आहेत.

हिमायतनगर पोलीसांना सद्रक्षणाय,खलनिग्रहणाय या बिद्र वाक्‍याचा विसर ?

नांदेड जिल्‍याच्‍या हिमायतनगर पोलीसांचे सैय्यद आमेर सह गुटखा तस्‍करांन सोबत मधुर संबध तर नाही ना ? असा प्रश्‍न सुज्ञ  नागरीकांना पडला आहे, जेव्‍हा  नांदेड जिल्‍याच्‍या हिमायतनगर वरुन अवैध गुटखा घेवुन जात असतांना यवतमाळ जिल्‍याच्‍या उमरखेड येथील पोलीस अधीकारी गुटखा जप्‍त करुन एका आरोपी सह मुद्देमाल जप्‍त करु शाकतात तर हिमायतनगर पोलीसांना सैय्यद आमेरचा लाखो रुपयाचा गुटखा साठवुन ठेवलेल्‍या ठिकानावर छापेमारी करुन का कार्यवाही करता येत नाही  हे तर एक चौकशीचा विषय आहे. माञ हिमायतनगर येथील पोलीस अधीकार्यांनी सैय्यद आमेरला अटक करुन उमरखेड पोलीसांच्‍या ताब्‍यात दिल्‍यास नक्‍कीच हिमायतनगर पोलीसांची मलीन होत असलेली छवी सुदरेन हे माञ तेवढेच खरे. हिमायतनगर शहर गुटखा तस्‍करीचे केंद्र बिंदु बनले असुन शाहरात मोठ्या पमाणात होत असलेल्‍या अवैध गुटखा तस्‍करीवर आळा घालण्‍यासाठी नांदेड जिल्‍याच्‍या वरिष्‍ठ पोलीस अधीकार्यान सह अवैध धंद्याचे गर्दनकाळ म्‍हणुन परिचीत असलेले जिल्‍याचे विषेश पोलीस महानिरीक्षक मा.निसार तांबोळी साहेबांनी लक्ष घालुन गुटखा तस्‍करावर कार्यवाही करावी अशी मांगणी जनते मधुन होत आहे.....     

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें