(चोरीच्या घटना,कायदा व सुव्यवस्था आबाधीत रहाव्या म्हणुन,सिंदखेड पोलीसांच्या वतिने पोलीस मिञ व शांती दुत स्थापीत करण्या साठी बैठकीचे आयोजन.)
सारखनी प्रतिनीधी / रशीद फाजलाणी
नांदेड जिल्याच्या माहुर येथे वाढत्या चोरीच्या घटना व सिंदखेड पोलीस ठाने हद्दीत किरकोळ चोरीच्या घटना वाढत चालल्याने पोलीसांचा तान वाढत असल्याचे लक्षात आल्याने मा.निसार तांबोळी साहेब,विषेश पोलीस महानिरीक्षक नांदेड, मा. प्रमोद कुमार शेवाळे साहेब,जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड,मा.विजय कबाडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, व मा.विलास जाधव साहेब उप विभागीय पोलीस अधीकारी माहुर यांच्या संकल्पनेतुन जिल्यात पोलीस मिञ व शांतीदुत स्थापीत करुन चोरीच्या घटना व कायदा व सुव्यवस्था कश्या प्रकारे आबाधीत ठेवता येईल या साठी दि. ४ ऑगष्ट रोजी सारखनी येथील ग्रामपंचाय मध्ये शांतता कमीटीचे आयोजन करण्यात आले होते या वेळी सारखनी येथील सरपंच,उप सरपंच, प्रतीष्ठीत व्यापारी, ग्रामस्थ, तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस अधीकरी कर्मचारी व पञकार उपस्तिथ होते.
कोवीळ १९ मुळे अनेक आरोपी न्यायालईन कोठळी (कारागृहा) मधुन सोडनयात आल्याने जिल्यात अनेक ठिकानी चोरीच्या घटना घडत आहेत त्यात अनेक गुन्हे उघडकीस होत असले तरी काही गुन्हे आजही तपासावरच आहेत. आरोपी माञ बाहेर फिरत आहेत व दुसर्या गुन्हेगारी घटनेला कश्या प्रकारे करता येईल या साठी प्रयत्नात आहेत, चोरट्यांच्या दोन पाऊल पुढे राहण्यासाठी पोलीस सरसावले असुन सिंदखेड पोलीस ठाने ह्रद्दीतील वाई बाजार व सारखनी येथे पोलीस मिञ व शांती दुतची स्थापना करण्याचे नियोजन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी केले असुन या दोन्ही बाजार पेठ मोठ्रया असुन या बाजार पेठेला किमान ४० तें ५० गावांच्या लोकांचे संर्पक जुडले असल्याने येथे मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी विक्री केली जाते.
सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी व्यापार्यांना विनंती केली आहे कि आपल्या दुकानाचे व्यवहार दुकान बंद होण्या आधी मोठी रक्कम बॅकेत जमा करावी,आपल्या प्रतिष्ठाना समोर सि.सि.टिव्ही उच्च दर्जाचे लावल्याने आपली व पोलीसांची मदत होईल,सध््या सायबर क्राईम वाढत चालल्या मुळे आपन शक्यतो अनोळखी व्यक्तींच्या संर्पकात जावु नये,आपल्या दुकान समोरील लाईट चालु ठेवावेत,ज्या मुळे अंधाराचा फायदा घेवुन चोरट्यांना दबा धरण्यासाठी संदी मिळनार नाही,अश्या अनेक बाबी वर चर्चा करण्यात आली. पोलीस मिञ यांना पोलीसांच्या वतिने एक ड्रेस, ओळखपञ, प्रमाणपञ, व राञी फिरण्यासाठी टार्च निशुल्क देण्यात येत आहे.सर्व व्यापारी व ग्रामस्थांनी पोलीसांना सहकार्य करावे असे आव्हान सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी केले आहे..
(सारखनी येथुन सिंदखेड पोलीस ठाने १५ कि.मी.अंतर असल्याने सारखनी येथे पोलीसांना आपली कामे करण्या साठी पोलीस चौकी करीता ग्रामपंचायत व सर्व सदस्या कडुन जागा देणार असल्याची घोषना.)
सिंदखेड पोलीस ठाणे हे निजाम कालीन असुन १०३ वर्षा ची ईमारत असुन कधीही ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सिंदखेड येथुन पेट्रोलींग साठी निगालेल्या वाहनाला किमान ३० मिनीट लागतात सारखनी वरुन वाई बाजार येथे पेट्रोलींग करुन येण्यासाठी वाहनाला किमान दोन तास लागतात या दोन तासात चोरटे आपला काम अटपुन पोबारा होतात हे कडु सत्य आहे. हा नेहमीचा गंभीर प्रकार टाळण्यासाठी सारखनी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.वनमाला ताई तोडसाम,उप सरपंच अंकुश जाधव हे सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेवुन लवकरच सिंदखेड पोलीसांना पोलीस चौकी साठी ग्रामपंचायत कडुन लेखी स्वरुपात जागा देनार असल्याची घोषना या वेळी करण्यात आली आहे,जर ति जागा मिळाल्या नंतर पोलीस चौकी ची स्थापना झाल्यास सारखनी येथे दैनंदीन कामें करण्यासाठी व राञी गस्त करण्यासाठी पोलीसांना चौकी उपलब्ध झाली तर सारखनी या बाजार पेठेत घडत असलेल्या चोरीच्या घटनाला पुर्न विराम लागेल यात काहीच शंका नाही. ज्या प्रकारे तातडीने जागा देण्याचे निर्णय ग्रामपंचायत कडुन घेण्यात आले आहे जागा उपलब्ध होताच त्याच गतीने जिल्याचे तिन्ही वरिष्ठ पोलीस अधीकारी पोलीस चौकी निर्माण करण्यासाठी जातीने लक्ष घालुन हा प्रश्न निकाली काडतील असा विस्वास व्यापार्रयांनी व्यक्त केला आहे....



कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें