ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

मंगलवार, 13 जुलाई 2021

सिंदखेड पोलीसांना गुगारा देवुन मागील बारा वर्षा पासुन फरार असलेला अट्टल गुन्‍हेगार अखेर सिंदखेड पोलीसांनी केले जेरबंद, न्‍यायालया समोर हाजर करताच आरोपीला १५ दिवसाची शिक्षा.

  


 
सारखनी प्रतीनीधी/ रशीद फाजलानी

नांदेड जिल्‍याच्‍या माहुर तालुक्‍यातील सिंदखेड पोलीस ठाण्‍यात चोरीच्‍या गुन्‍ह्यात तपास करीत असतांना पोलीस कोठळी मधुन पोलीसांना गुगारा देत आरोपी शिवाजी भानुदास शितोळे वय ४० वर्ष हा सन २००८ साली बारा वर्षा पूर्वी फरार झाला होता त्‍या प्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्‍यात गु.र.न.०५/२००८ कलम २२४ भादवी खाली गुन्‍हा दाखल झाला होता या मध्‍ये आरोपी शिवाजी भानुदास शितोळे वय ४० वर्ष रा.नाथनगर आर्णी जि.यवतमाळ याला अटक करण्‍यासाठी तेव्‍हा पासुन नांदेड पोलीस आरोपीच्‍या शोधात होती.  
सिंदखेड पोलीस ठाण्‍यात नव्‍याने रुजु झालेले व विर्दभातील आर्णी पोलीस ठाण्‍यात आपल्‍या कामाची छाप देवुन आलेले स.पो.नी.भालचंद्र तिडके यांनी आपल्‍या खबर्यांना सदर आरोपी बाबत माहीती काढण्‍याची सुचना दिली त्‍या वरुन दि.१२/०७/२०२१ रोजी आरोपी शिवाजी भानुदास शितोळे वय ४० वर्ष रा.नाथनगर आर्णी जि.यवतमाळ येथे असल्‍याची गोपनीय माहीती मिळाली त्‍या वरुन आर्णी  येथे सापळा रचुन अट्टल गुन्‍हेगार शिवाजी भानुदास शितोळे याला अटक करुन मा.न्‍यायालय माहुर जि.नांदेड येथे हजर करताच मा.न्‍यायालयाने आरोपी शिवाजी भानुदास शितोळे याला १५ दिवसाची शिक्षा देत एैतेहासीक निर्णय दिला आहे. अरोपी शिवाजी भानुदास शितोळे वय ४० वर्ष याला पोलीस बंदोबस्‍तात नांदेड येथील कारागृहात पोहचवीण्‍यात आले.
आरोपीला जेरबंद करण्‍या साठी सिंदखेड पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके,सोबत हे.कॉ.हकीम पठान,हे.कॉ.त्रींबक सानप, नाईक पो.कॉ.गजानन कुमरे, पो.कॉ.संतोष मोकले, पो.कॉ.गजानन नंदगावे, सह वाहन चालक यांनी मोलाची कामगीरी करत आरोपीला अटक केली.
घटनेची माहीती मिळताच जिल्‍हा पोलीस अधीक्षक मा.प्रमोद कुमार शेवाळे,अप्‍पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे नांदेड,अप्‍पर पोलीस अधीक्षक मा.विजय कबाळे भोकर,मा.उप विभागीय पोलीस अधीकारी विलास जाधव माहुर यांनी सर्व टिमची प्रशंसा केली.    


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें