दिव्यांग वृद्ध निराधार यांचे अनुदान लवकर दिले नाहीतर महाराष्ट्र संघटना अंदोलन करणार..
प्रतिनिधी : रशीद फाजलानी / देवीदास ढगे
सारखानी / नांदेड
दिव्यांग वृध्द निराधार यांना मिळणारे अनुदान हे स्थानिक प्रशाशनाने लाभार्थी ना लवकरात लवकर यांच्या हातात मिळावे या साठी या संकटकाळी दिव्यांगांना निवेदन देऊन अंदोलन करण्याची वेळ येत आहे. त्या पेक्षा यांच्या वाट्याला आलेले दुःख कोणते असणार.
केंद्र शासनाने व दिव्यांग आयुक्त पुणे यांनी अनुदान देण्याची अमलबजावणी करून व लाभार्थी ना लेखी आदेश हि दिले गेले मात्र प्रत्यक्षात याचा लाभ स्थानिक प्रशासना कडून मिळाला नाही. अनेकांवर उपासमारीची वेळ येत आहे.
दिव्यांग वृध्द निराधार यांना मिळणारे अनुदान सद्या उदभवलेल्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सोडविण्याची मागणी जोर धरत असून पुढील काळात हे वंचीत मोठया आंदोलनाच्या तयारीत आहेत.
आज जगातील सर्व देशा बरोबर भारतातही कोरोना महामारी नावाचे महाभयानक संकट आले आहे. या काळात सर्व सामान्य पण शरीराने सुधृड माणसाचे सुद्धा बेहाल होत आहेत. यांचे जगणे कठीण झाले आहे. मंग विचार करण्यासारखी बाब आहे. दिव्यांग वृध्द निराधार याच्या हाल विचार न केलेला बरा असे झाले असताना सुद्धा प्रशासन गंभीर का होत नाही. या लोकचा विचार करून च केंद्र शासन व दिव्यांग आयुक्त यांनी समाजातील या दुर्लब घटकात जीवन जगणाऱ्या लोकांना झळ लागू उपाशी पोटी राहू नये म्हणून यांना दरमहा मिळणारे अनुदान 3 महिने दुप्पट रकमी खात्यावर देण्याचे आदेश देऊनही मिळततर नाहीच शोकांतिका हि आहे कि जे नियमित मिळणारे अनुदान सुद्धा 4 महिन्या पासून मिळत नाही. तसेच या संकट काळात यांना अंतदोय योजनेत समाविस्ट करून त्याचा लाभ देण्याचे लेखी आदेश देऊन सुद्धा अमलबजावणी का केली जात नाही धान्यकिट दिलीजात नाही. संजय गांधी व इतर योजनेत पात्र लाभार्थी निवड आठ ते दहा महिने होत नाही. हे लाभार्थी ना काहीच स्थानिक प्रशासन कळवीत नाही.
या सर्व विकलांगांना विना अट अंतोदय योजनेत समाविस्ट करून त्याच बरोबर रेशनकार्ड देऊन आधार देण्यात यावा. संजय गांधी निराधार योजना कमिटीत दिव्यांगांना सह्यता म्हणून निवड करण्याचे शासनाचे आदेश असताना सुद्धा कमिटीत का घेतल्या जात नाही.
आताही वेळ हाताबाहेर गेलेली नाही. वेळीच लक्ष दिलेतर मोठा अनर्थ होण्याआधी प्रत्यक स्थानिक तहसीलदार साहेबांनी वरील सर्व घटकाचा विचार करून या समाजातील वंचीताना 15 दिवसाच्या आत न्याय दयावा अन्यथा दिव्यांग वृध्द निराधार यांच्या प्रश्ना साठी दिव्यांग वृध्द निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाखोरे पाटील यांच्या नेञत्वाखाली नांदेड जिल्यातील प्रत्यक तहसीलदारास त्यांच्या दालनात "झोपा काढो " आंदोलन करण्यात येईल. असे आणखी एक निवेदन देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे. या आंदोलन निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजूभाऊ शेरकुरवर तालुकाध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Nice
जवाब देंहटाएं