प्रतिनिधी , देवीदास ढगे
महाराष्ट्र गृह विभागाच्या नियमांना लक्षात घेऊन कोविड 19 मुळे उद्दभवलेली संसर्ग परिस्थिती मुळे सारखानी व परिसरातील नागरिकांनी सर्व नियमाचे पालन करून बकरी ईद हा उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरी करावी. सारखानी परिसरातील मुस्लिम नागरिकांची बैठक घेऊन सिंदखेड पोलीस ठाणे येथील ठाणेदार एम.डी.शिवरकर यांनी सूचना व मार्गदर्शन केले आहे.
सिंदखेड पोलीसठाणा अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील मुस्लिम बांधवाना फौजदार एम.डी. शिवरकर यांनी दि.28/ जुलै रोजी सारखानी येथे बैठक बोलावून बकरीईद हा उत्सव साजरा करण्या बाबत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्या मध्ये बकरी ईद ची नमाज मज्जित , ईदगा अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता आपल्या घरीच साजरी करावी. या उत्सवासाठी नागरिकांनी जनावरे ऑनलाईन पद्धतीने खरीदी करावे. शक्यतोर प्रतिकात्मक कुर्बानी करावी. प्रतिबंध क्षेत्रामध्ये कोणतीही शिथिलता नाही हे लक्षात ठेवावे. गर्दी करू नये.आरोग्य, पर्यावरण, वैद्यकिय शिक्षण तसेच ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन यांचे विहित नियमाचे पालन करने बंधनकारक आहे.
या सह अनेक महत्वाच्या सूचना , मार्गदर्शन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी केले या बैठकीला सारखानी व परिसरातील मुस्लिम बांधवानी मोठे प्रतिसाद देत काटेकोरपणे दिलेल्या नियमाचे पालन करूनच बकरी ईद साजरी करण्यात येईल असे सर्वानुमते आश्वासन दिले.या वेळी मौलाना नजीर भाई हाफीज सहाब,मोली ईस्माईल,महंमद नजमोद्दीन मौलाना , हाज्जी बाहुद्दीनभाई, रशीद फाजलानी,बाबु सेठ, ईदरीस सेठ फाजलानी, ईमरान भाई अकबानी,रफिक सेठ फाजलानी, दिलदार ढाबे वाले, ईकबाल सेठ वेल्डींगवाले,सलीम भाई कुरैशी, अकबर सेठ कुरैशी,आरीफ भाई, शेख अली भाई, रहीम भाई,अबरार भाई,सना उल्ला भाई,ईनुस भाई फाजलानी, हामीद खान सहाब आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी घरी राहून सर्व उत्सव साजरे करून शासनास मदत करू असे पत्रकार रशीद फाजलानी यांनी आपले मत व्यक्त केले.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें