
सुनील श्रीमनवार
मांडवी ( वार्ताहर )मांडवी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्य दक्ष पोलीस
उप निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे यांना गडचिरोली मध्ये नक्षल विरोधी मोहिमेत
उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारत सरकारच्या केंद्रीय गृह विभागातर्फे 'आंतरिक
सुरक्षा पदक' हे विशेष पदक प्राप्त झाले आहे.भारत सरकारच्या केंद्रीय गृह
खात्याकडून अतिसंवेदनशील भागात खडतरपणे कार्य करणा ऱ्या पोलीस अधिकारी
व कर्मचार्याना प्रोत्साहित करण्यासाठी हे विशेष पदक दिल्या जाते.यासाठी योग्य
व्यक्तींची निवड केल्या जाते. यावर्षी राज्यात चारशेपर्यंत तर नांदेड जिल्यात दहा
पोलीस अधिकारी व कर्मचार्याची निवड या विशेष पदकासाठी केल्या गेली यात मांडवीचे
पो उप निरीक्षक शिवप्रसाद कराळे यांचाही समावेश आहे.आय. टी. मध्ये शिक्षण झालेले
शिवप्रसाद कराळे हे 2014 पासून पोलीस विभागात कार्यरत आहेत.2015 ते 2018 या
तीन वर्षांत ते गडचिरोली जिल्यात नक्षल मोहिमेविरुद्ध अनेक धाडसी मोलाचे कार्य केले.
या कार्याची पावती म्हणून हे विशेष पदक त्यांना देण्यात आले. मांडवी ठाण्याचे सपोनि
संतोष केंद्रे सह सर्व कर्मचारीवृंदानी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. मांडवी
ठाण्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास त्यांनी केला तर अनेक प्रकरणे तत्परतेने उजेडात
आणली. विषेश बाब म्हणजे बहु चर्चीत तोतया तहसीलदार प्रकरणाचा तपास पोलीस
उप निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे हे करित आहेत आणि लवकरच या ही प्रकरणात दोषींवर
कारवाई केली जाईल असे जानकाराचे मत आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें