ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शनिवार, 9 मई 2020

अकोल्या चे खाजगी डॉक्टर वेगळा उपक्रम राबवून करताहेत रुग्ण सेवा...


 


प्रतिनिधी :  रशीद फाजलानी,  देविदास ढगे.   नांदेड /  अकोला 

अकोला मध्ये आयएमए , निमा ,  जीपीए ,  हिंपा , आयडीए ओल्ड सिटी असोसिएशन आरोग्य भारती यांच्या संयुक्त उद्देशाने डाबंडि  रोड येथील कस्तुरबा गांधी महिला रुग्णालयात या भीषण संकटकाळी आरोग्याची सेवा देवयायची म्हणुन  " कम्युनिटी क्लिनिक  " चा शुभारंभ करण्यात आला आहे. 
               आज जगासह आपल्या संपूर्ण देशावर कोरोना विषाणू प्रादुर्भाव संकट अधिक फैलावत असल्याने आपला देश ,  महाराष्ट्र सध्यस्थित अतिशय गंभिर प्रसंगातून गुजरताना आपन पाहत आहोत. प्रत्येक व्यक्ती आज दहशती खाली वावरत आहे. या अभूतपूर्व म्हणजे ता आधी असे संकट कधी आलेच नाही. त्या मुळे या संकटाचा सामना करायचा कसा हा प्रश्न सर्वासमोर उभा असताना यात फक्त देवाच्या रूपात आपले डॉक्टर ,  नर्स ,  आरोग्य सर्व कर्मचारी , मेडिकल शॉप वाले ,  आपले पोलीस भाऊ सर्व पोलीस यंत्रणा त्याचं बरोबर मनपा सफाई कर्मचारी  व सर्व ग्रामपंचायत ,  नगरपलिक ,  महानगरपालिका हे सर्व आपला जीव धोक्यात घालून  दिवस रात्र काम करताना आपल्याला दिसत आहेत. 
   आज हे देवता संकटाचा  सामना करण्यास उठले नसते तर काय झाले असते याची कल्पना करणे सुद्धा अवघड आहे.या सर्व बाबीचा विचार करताना अकोला येथील डॉक्टर ओसोशियन ने प्रसंशनीय असा उपक्रम राबवित आहेत.या सर्वानी एकत्र येत एक विशेष क्लिनिक च उघडले आहे.आणि त्याला  " कम्युनिटी क्लिनिक  "असे नाव देण्यात आले आहे. या क्लिनिक मध्ये प्रामुख्याने शहरातील व परिसरातील अनेक लोकांना फायदा होईल यामध्ये सर्व मोफत तपासणी व उपचार करून मिळणार आहे.जे संशियीत कोरोना बाधित व्यक्ती वाटतात त्यांना पुढील उपचारासाठी व कुठे ऍडमिट होयायचे,   काय काळजी घ्यायची यावर अनेक मौलाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.कारण अनेक माध्यमातून काही covid 19 बद्दल अफ़वा ही पसरवत आहे.त्या मुळे रुग्णामध्ये गैरसमज होऊन सैरावैरा धावत आहेत.या सर्वाचा विचार करून येथे संशियिताना योग्य असे मार्गदर्शन करून घाबरून जाण्याचे कारण नाही.योग्य आरोग्य मार्गदर्शन केले जातं आहे.आणि प्रशासनास खुप मोठया प्रमाणात या वेळी मदत ही होईल.
सदर चे रुग्णालय हे सकाळी 9 ते  11  या वेळेत जुन्या शहरातील खाजगी व्यवसाय करणारे डॉक्टर आपली सेवा देणार आहेत.
    या देशहित उपक्रम व क्लिनिक चे उदघाट्न प्रसंगी मनपा आरोग्य अधिकारी डॉ.फारुख शेख ,  डॉ.प्रशांत मुळावकर ,   डॉ. पराग टापरे ,  डॉ. कमल लड्ढा ,  डॉ.अमोल केळकर ,  डॉ. सुनील बिऱ्हाडे ,  डॉ.ज्योती कोकाटे ,  डॉ.अशोक ओळंबे   डॉ योगेश पाटील ,  डॉ. मनोहर घुगे ,  डॉ.रितेश श्रीवास्तव ,  डॉ. सूरज इप्पर  ,  डॉ.दिनेश राठोड ,  डॉ.आशिष पनपालिया ,  डॉ.अनंत तेलंग ,  डॉ.महेश धारस्कर ,  डॉ.अथर पांडे ,  डॉ.चैतन्य वाकोडे ,  डॉ.श्रीपाद पुसेगावकर  व मनपा सभापती सतीश ढगे आदी उपस्थित होते.
        या वेळी covid 19 बद्दल महत्वाचे मार्गदर्शन एजीएमसी चे डॉ.रमेश पवार यांनी केले यावेळी कम्युनिटी क्लिनिक च्या सेवेचा लाभ घ्यावा असे अहवान सर्व  डॉक्टर नी केले आहे. 
                या उपक्रमाचा व सर्व टीम चा सेवा देणाऱ्या डॉक्टर ,  कर्मचारी या सर्वांचे मराठवाडा न्यूज कौतुक व  सन्मान करून अनेक अनेक शुभेच्छा देते.त्याच बरोबर अनेक अशा शहरातील डॉक्टराणा अहवान करते की,  खाजगी सेवा बरोबर आपन असाही उपक्रम राबवावा कारण आज आपन सर्वजण संकटात आहोत. 
 त्याच बरोबर नागरिकांना मात्र एकच आव्हान बिना कामाचे बाहेर पडू नका.घरीच रहा सुरक्षित राह. पाहत राह आणि वाचत राह मराठवाडा न्यूज..     ........   .......    ...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें