Turn off for: Marathi
किनवट नांदेड प्रतिनिधि रशीद फाजलानी

याबाबत सविस्तर वृत्त असे की किनवट तालुक्यातील तल्लारी व झळकवाडी जंगलालगत असलेल्या पुंजाजी महादू शेळके यांच्या शेतात एकापाठोपाठ दोन बिबट्यांचा मृतदेह आढळून आल्याने नांदेड वन विभागामध्ये व किनवट वन विकास महामंडळामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे . या पैकी एका बिबट्याचा मृत्यू दि . 15 एप्रिल रोजी बुधवारी मृतदेह मिळून आला होता . किनवट विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पंचनामा व शवविच्छेदन करून त्याचा अंत्यविधी केला होता .या घटनेला दोन दिवस उलटले नाहीत तर आज दि . 18 एप्रिल रोजी दुसऱ्या बिबट्याचा मृतदेह त्याच शेतकऱ्यांच्या शेतात प्रथम मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याच्या ठिकाणा पासून पन्नास फूट अंतरावर बिबट्याच्या मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे .वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन या गंभीर घटनेची माहिती नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांना दिला .अशा या गंभीर घटनेची दखल घेत नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन मृत अवस्थेत असलेल्या बिबट्याचे प्रत्यक्ष पाहणी केली .सदर बिबट्याचा पंचनामा करून पशुधन विकास अधिकारी व्हि.एल. बिराजदार, अजय शिवणकर, ओम प्रकाश शिंदे, एस एन मिराशे यांनी यावेळी त्या बिबट्याचे शवविच्छेदन करून वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले . एकापाठोपाठ दोन बिबट्याचा मृतदेह आढळल्याने त्याच्यावर विषप्रयोग केला की काय अशी शंका वर्तवली जात असताना गावातील लोकांना विश्वासात घेऊन याचा तपास करा असा सल्ला नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक अशिष ठाकरे यांनी यावेळी वनविकास महामंडळाचे उपविभागीय व्यवस्थापक एस एच व्यास व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिला .असे असेल तरीही किनवट चव्हाण विकास महामंडळाच्या जंगलात कवठाला व सिरमेटी शिवारात ही मागे दोन-तीन महिनेखाली दोन बिबटे मृतावस्थेत आढळले होते त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप पर्यंत समोर आलेले नाही .वन विकास महामंडळाच्या ताब्यातील जंगलात सतत होणाऱ्या या हिंस्र प्राण्यांच्या मृत्यूचे कारणांचा तपास लागत नाही . त्यामुळे या भागात हिंस्र प्राण्यांना मारणारी शिकाऱ्यांची टोळी सक्रिय आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे .त्यामुळे शासनाने तात्काळ या गंभीर गोष्टीकडे लक्ष देण्याची परिसरातील वन प्रेमी नागरिक करत आहेत .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें