ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

रविवार, 12 अप्रैल 2020

मांडवी पोलिसांनी लॉकडाऊन काळात दारू च्या मुद्दे मालासह आरोपी घेतले ताब्यात.

प्रतिनिधी, मांडवी /नांदेड. देवीदास ढगे 
         कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्या साठी सर्व पोलीस यंत्रणा सज्ज असताना किनवट तालुक्यातील मांडवी पोलीसस्टेशन कार्यक्षेत्रातिल गस्तीवर असणारे पोलीसअधिकारी,  कर्मचारी यांनी 12 एप्रिल सकाळी 7:30 वाजता अवैध दारू साठा सह आरोपीना ताब्यात घेतले. 
     पिंपळगाव ते कणकी रोडवर दोन मोटार सायकलवर वेगवेगळ्या 352 बॉटल दारूसाठा हस्तगत केला असून त्याची किमत 76020 रुपये किमतीची आहे.या प्रकरणात दोन आरोपी अटक केली असूनएक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. आरोपी विरुद्ध मांडवी पोलीसस्टेशन मध्ये गु.र. क्र. 32/2020कलम 188,  269,  270,  271,  भादंवि महराष्ट्र अधिनियम कलम सह इतर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस चौकशी सुरु आहे. 
   या मध्ये पोलीसउपनिरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे ,  सपोनि संतोष केंद्रे ,  पोकॉ वैजनाथ मोटरगे ,  पोकॉ संतोष मठपती ,  पोकॉ शाम चव्हाण ,  होमगार्ड जाधव यांनी या संकट काळात आपले कर्तव्य बजावले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें