प्रतिनिधी -किनवट /नांदेड. रशीद फाजलानी..
संपूर्ण जगात व देशात कोरोना विषाणू प्रादुर्भाव झाला असल्याने नांदेड जिल्तातील अतिदृगम व जिल्यापासून जवळपास 180 कि.मी. असलेले तालुके म्हणजे किनवट माहूर होत कोरोना संकटामध्ये विविध स्थरावरील प्रशासकीय यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत परंतु किनवट तालुक्यात ही यंत्रणा अधिक सतर्क होण्यासाठी नांदेड जिल्याचे पालकमंत्री मा.अशोकराव चव्हाण यांनी प्रयत्न करावे ही मांगणी राष्ट्रवादी काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
किनवट व माहूर तालुके हे विदर्भ तेलनगना राज्याच्या सीमा लगत असल्याने यवतमाळ व आदिलाबाद येथील अनुक्रमे 8 व 13 असे कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आहेत त्यामुळे ग्रीन झोन मध्ये असलेला हा जिल्हा हा कधीही ऑरेंज झोन मध्ये जाऊ शकतो या पार्श्वभूमीवर जिल्हाच्या सीमा बंद राहणे व लॉकडाऊनचे नियम काटेकोर पाळण्याची गरज आहे.
नांदेड जिल्याचे पालकमंत्री म्हणून अशोकराव चव्हाण यांनी जिल्यातील इतर तालुक्या प्रमाणे याही तालुक्यात लक्ष घालणे आवश्यक आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें