ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 26 जुलाई 2019

गोंडवडसा येथे कृषी सहाय्यक कार्यालयाचे उदघाटन

गोंडवडसा येथे कृषी सहाय्यक कार्यालयाचे उदघाटन.
(सारखनी प्रतिनिधी)


दि. 24 जुलै रोजी माहुर तालुक्यातील मौजे गोंडवडसा येथे कृषी सहायक कार्यलयाचे उदघाटन माहूर तालुका कृषी अधिकारी  ए.एम.पिंपळगावकर याच्या हस्ते करण्यात आले या  वेळी उपस्थित गावातील सरपंच
व ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी मोठया प्रमाणात हजर होते गोडवडसा गावाचे कृषी सहायक   सुधीर राजूरकर
यांनी आपल्या  कार्यालयच्या माध्यमातून कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा या साठी  त्यांनी केलेल्या कामाची फोटो आपल्या कार्यलयात लावली व त्या   कृषी विभागाच्या विविध योजनेची माहिती कार्यालया मार्फत शेतकऱ्यांना मिळावी म्हणून  राजूरकर यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे खूप सुंदर कार्यालयाची  मिर्मिती केली छोट्या गावात जनु डिजिटल कार्यालयाची निर्मीती केली  त्या बदल त्याचे अभिनंदन व पुष्पगुच्छ देऊन माहुर  तालुका कृषी अधिकारी  ए. एम. पिंपळगावकर   यांनी स्वागत  केले,कृषी सहाय्यक   ए.आर.थोरे यांनी सूत्र संचालन केले व
फेरोमन ट्रॅप व  लाईट ट्रॅप ची माहिती दिली.


      कृषी सहाय्यक व्ही. एस. ठाकरे यांनी फवारणी करताना घ्यावयाची काळजी व कीड व रोग विषयी माहिती दिली 
कृषी सहाय्यक गजानन अमृते यांनी  सेंड नेट ,पैक हाउस उन्नत शेती समृद्ध शेतकरी ,ठिबक ,तुषार सिंचन विषयी कृषी विभाच्या विविध  योजनांची माहिती दिली
कृषी सहाय्यक विठ्ठल  इतकपली  यांनी  सोयाबीन ,कपाशी कीड रोग विषयावर चर्चा केली व  माहिती दिली.
कृषी सहाय्यक कार्यालयाच्या निर्मीती ने या भागातील शेतकर्याना नक्की फायदा होईल असा विस्वास उपस्थित शेतकर्यानी व्यक्त केला आहे.



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें