हार्ट अटॅक ने पीडित रुग्णाला वाचवण्याची 16 जून ला सराव कार्यशाळा
नांदेड प्रतिनिधी (रशीद फाजलानी )
"अशोक शेठ एक 53 वर्षीय श्रीमंत व्यापारी. त्यांना एकच मुलगा तोही त्यांच्या बरोबर व्यापार सांभाळायचा. मोठा पारिवारिक व्यवसाय 7 ते 8 ऑफिस मध्ये कर्मचारी. आज सकाळी दैनंदिनी आटपून शेटजी मुलासोबत आपल्या ऑफिस ला आले व काउंटर वर बसले कालचे प्रलंबित कामे सुरू केली. दुकानात 5 नोकर व मुलगा हे सुद्धा कामाला लागले. अचानक शेटजी बिल बनवता बनवता काउंटर वर कोसळले व बेशुद्ध झाले. सगळे जण घाबरले कोणाला काय करावे हे सुधारत नव्हते. त्यांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचे अतोनात प्रयत्न केले पण सगळे व्यर्थ त्यांची प्रकृती अधिकच खराब होत गेली. एकाने अंबुलन्स बोलावली व त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले पण वेळ निघून गेला होता. जवळपास 40 मिनिटं त्यांना काहीच उपचार मिळाले नाही. हृदविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं मृत्यू झाला होता. योग्य वेळी प्रथमोपचार न झाल्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. त्यांच्या मुलासाठी हा खूप मोठा धक्का होता ते काहीच करू शकले नाही त्याच्या वडलांचे प्राण त्याच्यासमोर निघून गेले व तो असहाय्य बघतच राहिला."
वरील परिस्थिती ही सत्यघटना आहे अशा प्रकारच्या घटना आपण रोजच ऐकतोय आज आपण जर स्वतःला अशोक शेट च्या मुलाच्या व दुकानातील इतर सदस्यांच्या जागी असल्याची कल्पना केली तर आपली ही परिस्थिती असहाय्य च असेल.
अशा वेळेस आपल्याला माहिती असावी ती पुनरुज्जीवन (CPR- Cardio Pulmonary Resuscitation) च्या प्रक्रियेची. अमेरिकन हार्ट असोसिएशन च्या मते जी व्यक्ती बेशुद्ध आहे आणि नेहमीप्रमाणे श्वास घेत नाही तिथे पुनरुज्जीवन किंवा सीपीआर सुरू करा म्हणजेच कृत्रिम रित्या श्वासोश्वास व रक्तभिसरण चालू ठेवा. जेणेकरून मेंदूला रक्ताचा पुरवठा सुरू राहील व पुढील मदत मिळेपर्यंत आपणास मेंदूला मृत होण्यापासून वाचवता येईल.
मेंदूला प्राणवायू युक्त रक्ताचा पुरवठा दहा सेकंद जरी बंद पडला तरी माणूस बेशुद्ध होतो. ही परिस्थिती जर 3 ते 4 मिनिट राहिली तर मेंदू कायमचा निकामी होऊ शकतो. मेंदू निकामी झाल्यानंतर जीवन पूर्ववत होत नाही. हृदयक्रिया बंद पडल्यानंतर तीन ते चार मिनिटात योग्य उपचार मिळाल्यास मेंदूचा जिवंतपणा टिकवता येतो.
मृत्यू केव्हाही व कुठेही येऊ शकतो प्रत्येक ठिकाणी डॉक्टर उपलब्ध असेलच असे नाही त्यामुळे पुनरुज्जीवन किंवा सीपीआर माहिती असलेली व्यक्ती अपघात स्थळी उपलब्ध असेल तरच तीन चार मिनिटात पुनरुज्जीवन शक्य आहे.
गर्दीच्या ठिकाणांवर हृदय विकारा चे प्रमाण जास्त आहे. म्हणून येथे काम करणारे कर्मचारी जसे की पोलीस, सिक्युरिटी गार्ड, हॉस्पिटल स्टाफ, शिक्षक, लाईफ गार्ड, बांधकाम करणारे कामगार, हॉटेल व रेस्टॉरंट स्टाफ यांना व आजकाल व्यामशाला (जिम) मध्ये हार्ट फेल चे प्रमाण वाढले आहे म्हणून येथे काम करणार्या कर्मचाऱ्यंसाठी सीपीआर ची संपूर्ण प्रशिक्षण घेणे आता अनिवार्य झाले आहे. त्यांना जर CPR प्रशिक्षण मिळाले तर ते कित्येक लोकांचे प्राण वाचवण्यास मदत करू शकतील.
लहान व शहरापासून दूर असणाऱ्या गावामध्ये वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या माझ्या डॉक्टर मित्रांनी पण सी पी आर व बेसिक लाईफ सपोर्ट बद्धालची संपूर्ण माहिती असणे अपेक्षित आहे जेणे करून त्यांना स्वतःची कार्यक्षमता वाढवून शहरी हॉस्पिटल ची मदत मिळेपर्यंत जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचविण्यासाठी समाजाची मदत करता येईल.
घरी कार्यालय प्रवासात कुठेही ही आणि कधीही आरोग्यविषयक आणीबाणीचा प्रसंग उद्भवू शकतो अशा प्रसंगी वैद्यकीय मदत मिळवण्यात पूर्वीच्या वेळात काय करावे आणि मुख्यतः काय करू नये याचे मार्गदर्शन शिबिर हॉटेल अतिथी शिवाजी नगर नांदेड येथे 16 जून 2019 रोजी आयोजित केले आहे तरी जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग नोंदवावा हीच विनंती.
शिबिरात प्रमाणित व प्रशिक्षित डॉक्टरांची विषेश टीम मार्गदर्शन करनार आहे. निरामय एज्युकेशन अँड मेडिकल रिसर्च फाउंडेशन चे अकोला येथील वरिष्ठ डॉ योगेश पाटील व डॉ सुनील बिहाडे, शुभमकरोति फाउंडेशन चे डॉ प्रवीण इंगळे, अजिंक्य फिटनेस पार्कचे अधिकारी धनंजय भगत व सुशोभा होमिओकेअर नांदेड चे डॉक्टर नितीन सोनी ते मार्गदर्शन करणार आहेत.
नाव नोंदणी साठी संपर्क. 9423773404, 9422874289.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें