पोलीस अधिक्षक संजय जाधव यांच्यासाठी हारतुरे न आणता तो निधी दुष्काळ निधीत द्यावा
संजय जाधव मित्रमंडळाचे आवाहन
नांदेड(प्रतिनिधी रशीद फाजलानी )
16 मे 2019 हा दिवस नांदेडच्या पोलीस अधिक्षक संजय जाधव यांचा जन्मदिन आहे. या जन्मदिनाच्या शुभप्रसंगी त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी फुलांचे हार, शाल, श्रीफळ, मिठाई आदी बाबींवर खर्च करण्याऐवजी तो खर्च दुष्काळ निवारण निधी म्हणून जिल्हाधिकरी कार्यालयात जमा करावा असे आवाहन संजय जाधव मित्रमंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.
संजय जाधव नांदेडचे पोलीस अधिक्षक झाल्यानंतर त्यांचा जन्मदिन 16 मे रोजी होणार आहे. 1996 ते 2001 या दरम्यान ते नांदेड जिल्ह्यात कार्यरत होते. सुरूवातीच्या काळात परीवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षकाचा काळ त्यांनी नांदेड शहरात काढला. त्यानंतर त्यांची नियुक्ती देगलूर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक म्हणून झाली. त्यामुळे नांदेड शहरात व नांदेड जिल्ह्यात त्यांची मोठी फॅन फॉलोईंग आहे. त्यांचा वाढदिवस माहित करण्यासाठी मागिल कांही दिवसांपासून अनेकांनी प्रयत्न केले आहेत.
नांदेड जिल्ह्यात संजय जाधव यांच्यावर प्रेम करणारी मंडळी 50 हजार असेल असे लिहिणे म्हणजे सुर्याची चमक कमी करण्याचा प्रयत्न असेल पण यातून असे मांडायचे आहे की, पुष्पहार, पुष्पगुच्छ, शाल, मिठाई आदी वस्तूंवर संजय जाधव यांच्यासाठी खर्च करणाऱ्या मंडळीने प्रत्येकी 100 रुपयांची तयारी दाखवली तर या दोन आकड्यांचा गुणाकार किती होईल ते वाचकांनी पाहावे.
या संदर्भाने संजय जाधव मित्रमंडळाच्यावतीने सर्व संजय जाधव प्रेमींना, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, या जगात आपण जन्मलो आहोत ते आपल्यावर कर्ज आहे. हे कर्ज फेडण्याची संधी समाजाच्या सेवारुपाने प्रत्येकाला उपलब्ध होते. त्यामुळे संजय जाधव यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने कोणत्याही वस्तूवर खर्च करण्याऐवजी प्रत्येकाने ते पैसे नांदेड जिल्ह्याच्या दुष्काळ निधीत जमा करावेत कारण आज पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत भयंकार आहे. जनावरांना चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे संजय जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त पैसे खर्च करण्याची इच्छा ठेवणाऱ्यांनी ते सर्व पैसे नांदेड जिल्हा दुष्काळ निधीत जमा करावेत असे आवाहन संजय जाधव मित्रमंडळाने केले आहे. संजय जाधव यांना भेटून त्यांच्या जन्मदिनाच्या शुभकामना सर्वांनीच त्यांना द्यावे पण प्रत्यक्षात त्यांच्यासाठी कांही आणू नये अशी विनंती आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें