नांदेड जिल्याच्या किनवट तालुक्यातील सारखनी घाटात सरपटनार्या मांडुळ सापाची तस्करी करनार्या आरोपींना वन विभागाच्या अधीकार्यांनी पकडले माञ किनवट वनपरीक्षेञाचे वादग्रस्त अधीकारी राजेंद्र नालेच्या पथकाने एका शिक्षकाला चक्क आरोपी समजुन हाताला दोरी बांधुन आरोपी सारखी वागनुक दिल्याने वन विभागाच्या अधीकार्यांच्या या दादागीरीचा सर्वञ रोष व्यक्त केला जात आाहे.
नांदेड जिल्याच्या किनवट तालुक्यातील सारखनी किनवट रोडवरील जंगलात दिनांक ३० एप्रील रोजी बारा वाजताच्या सुमारास एका महीले सह काही संशईत आरोपींना मांडुळ जातीच्या सापाची तस्करी करीत असल्याच्या संशया वरुन किनवट,मांडवी,माहुर व सारखनी येथील वन विभागाच्या अधीकार्यांनी ताब्यात घेतले तर किनवट वनपरिक्षेञाचे वादग्रस्त अधीकारी राजेंद्र नाले व त्यांच्या चेल्या चपाट्यांनी किनवट माहुर राज्य मार्गावर काही काळ दहशत निर्माण करत भेटेल त्यांला पकडुन चक्क आरोपी सारखी वागणुक देण्याचे सौजन्य दाखवत गावगुंडा सारखी दहशत निमार्ण केली होती त्याचा फटका किनवट तालुक्यातील दहेली गावच्या शिक्षकाला बसला रसत्यावर दादागीरी करनार्या वन विभागाच्या अधकार्यांनी या शिक्ष्काच्या दुचाकीची चावी हिसकुन शिक्षकाच्या हाताला दोरी बांधुन आरोपीच्या रांगेत उभे केले. या घटनेचा संताप सदर शिक्षकाने व्यक्त केले असुन वन विभागाच्या दादागीरीचा निषेध व्यक्त केलाजात आहे...
सतत वादाच्या भौर्यात अडकत असलेल्या राजेंद्र नाले नि घटना स्थळावर येवुन माहीती घेनार्या पञकारांना चिञफीत घेण्यास मज्जाव करत पञकारांच्या स्वतंञतेवर दडपन आनण्याचे प्रयत्न केले,परंतु पञकारांनी राजेद्र नालेच्या हुकुमशाहीला न जुमानता घटनेचे सत्य आमच्या प्रेक्षकापर्यंत आनत एका सज्जन शिक्षका सोबत झालेल्या दुरव्यव्हाराची सत्यता उघड कीस केली.
पञकारांला चिञफीत न घेवु देण्याच्या मागचा उद्देश म्हन्जे मांडुळ सापाच्या तस्करांन सोबत हात मिळवनी करुन त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले जात आहे,तर राज्य सरकारच्या कार्यकाळात भ्रष्ट अधीकार्रयांना कुठला माज आला असा प्रश्न सदर शिक्षका सह सर्व सामान्यांना पडला आहे....
वन विभागाने मांडुळ सापाच्या तस्करांना जेर बंद केले हे प्रशंसनीय असले तरी सर्व सामान्यांना ना हक ञास देने हे राजेंद्र नाले व त्यांच्या पथकाची गुंडागर्दी नाही तर काय असा प्रश्न या निमीत्ताने उपस्तीथ झाला आहे.या गंभीर प्रकरणात शिक्षक संघटना काय पाउल उचलेल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे...


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें